Breaking News

महत्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्थादुसर्‍या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणार्‍या भारतीय संघाचे आव्हान शनिवारी (दि. 19) तिसर्‍या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये नाट्यमयरित्या संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर आठ गडी राखून मात करीत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक मार्‍यापुढे भारताचा दुसरा डाव …

Read More »

करपद्धतीत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे का आहे?

इन्कम टॅक्स भरण्याची अखेरची मुदत जवळ आली की करांची सर्वाधिक चर्चा होते. कर आणि कर पद्धती हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असूनही त्याविषयी पुरेशी जागरूकता झालेली नाही. करांची अपरिहार्यता एकदा समजून घेतली की करपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याला महत्त्व का आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच राहत नाही. इन्कम टॅक्स …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सोनिया गांधी नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र मुंबई : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतेच एक वर्ष झाले. असे असले तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा …

Read More »

पोरखेळ की सत्तेचा खेळ

कांजूर येथील जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने झणझणीत चपराक दिल्यानंतर ठाकरे सरकार भानावर येईल असे वाटले होते, परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. या सार्‍या प्रकाराला कुरघोडीच्या राजकारणाचे स्वरुप देऊन सत्ताधारी पक्षाला कसला आनंद होतो आहे, कोण जाणे? आता बांद्रा-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या मोकळ्या भूखंडावर मेट्रो कारशेड उभी करण्याच्या दृष्टीने …

Read More »

शाळांमधील शिपाई पदे रद्द करण्याच्या भूमिकेचा रायगडातील संघटनेकडून निषेध

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन अलिबाग : प्रतिनिधी राज्याच्या शाळांमधील शिपाई संवर्गातील पदे रद्द करून ती कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून जोरदार विरोध होत आहे. रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाने शुक्रवारी (दि. 18) शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी निवेदन …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूलमधील 1991-92च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयोजित स्नेहमेळावा कर्जत येथील नाना-नानी फार्म हाऊस येथे झाला. शालेय जीवन संपले की शाळेतील मित्रवर्ग उच्च शिक्षण, नोकरी-धंदा या कारणामुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी असल्या तरी …

Read More »

नेरूळमध्ये आरोग्य शिबिर उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग क्रं 85 मध्ये नेरूळ सेक्टर 6च्या रहीवाशांकरिता, सारसोळे गाव आणि कुकशेत गावाच्या ग्रामस्थांकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून दोन दिवसांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर आयोजनासाठी स्थानिक प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाता पाटील …

Read More »

अ‍ॅडलेड कसोटी रंगतदार अवस्थेत

भारताची भेदक गोलंदाजी; ‘कांगारूं’ना रोखले अ‍ॅडलेड : वृत्तसंस्थारविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने 53 धावांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने एक गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (0) …

Read More »

अलिबागमध्ये ईमेज कॅलेंडर प्रकाशन सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि. 18) येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा माहिती अधिकारी …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी पनवेल मनपाचे मोठे पाऊल!

महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजना पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजनांना शुक्रवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी व्यक्त …

Read More »