Breaking News

महत्वाच्या बातम्या

वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन

कर्जतमध्ये विद्युत देयकांची जाहीर होळी कर्जत : बातमीदार तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी (दि. 23) कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढीव वीज बिल आणि बिल न भरल्यास वीज मीटर कापण्याचे सत्र महावितरण कंपनीने सुरू केले आहे. …

Read More »

आवास योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांना द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धाकटा खांदा ग्रामस्थांचा ठिय्या पनवेल : रामप्रहर वृत्तखांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेतंर्गत होत असलेल्या प्रकल्पात आश्वासन देऊनही कंत्राटदाराकडून काम दिले जात नसल्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी सोमवारी (दि. 23) आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी …

Read More »

जनतेची फसवणूक करणार्‍या तिघाडी सरकारचा तीव्र निषेध

वाढीव वीज बिल होळी आंदोलनाला पनवेल परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधीवाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ अशी घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकार आता मात्र राज्यातील नागरिकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारविरोधात भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 23) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार पनवेल परिसरातही आंदोलन करून …

Read More »

राज्यात पुन्हा निर्बंध?

आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई : प्रतिनिधीदिवाळीपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने पाच हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी …

Read More »

रायगडात 96 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 22) नवे 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर 79 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 10) तालुक्यातील 70, खालापूर आठ, माणगाव व रोहा प्रत्येकी चार, अलिबाग व सुधागड प्रत्येकी तीन, कर्जत दोन आणि पेण …

Read More »

नांदगाव हायस्कूलसमोरील अनधिकृत बांधकाम हटवले

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण करून भाजी विक्रीसाठी काही शेड उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्याविरोधात मुख्याध्यापकांनी उपोषणाचा इशारा देताच संबंधीतांनी या शेड तात्काळ हटवल्या आहेत. मुरूड तालुक्यातील यशवंतनगर -नांदगाव येथे श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय ही माध्यमिक शाळा  आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर  अज्ञात इसमांनी …

Read More »

कळंबोली-अंजप रस्त्याची दुर्दशा

कडाव : प्रतिनिधी तालुक्यातील कळंबोली ते अंजप हा सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त झाला असून, त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनाही खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील व ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते विकासापासून अनेक कोस दूर आहेत. …

Read More »

द्रुतगती महामार्गावर सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या

जीवितहानी नाही; वाहनांचे मात्र नुकसान खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (दि. 22) सकाळी सहा गाड्या  एकमेकांवर आदळल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सणानंतर सुट्टी संपल्याने द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर रविवारी सकाळी वाहनांची मोठी गर्दी होती. आडोशी …

Read More »

शाळांचा पुनश्च श्रीगणेशा

कोरोनामुळे बंद असलेल्या गोष्टी हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरे काही दिवसांपूर्वी खुली झाली. आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंबंधी निर्देश दिले असले तरी पालक मात्र पाल्यांना सध्या शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. राज्यातील …

Read More »

म्हसळा नगरपंचायतीचा अजब कारभार

भारतीय जनता पक्षाने केले सर्वेक्षणाचे आवाहन म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा, तळा व माणगाव या तीनही नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तीनही नगरपंचाय तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, मात्र तेथे स्थानिक विकासाचं उद्दिष्ट किती पूर्ण झालं याचा अभ्यास त्या त्या …

Read More »