Breaking News

महत्वाच्या बातम्या

जांभूळपांंड्यातील बंद शाळेत साप; सर्पमित्राकडून जीवदान

पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील साडेतीन महिन्यांपासून शाळांमधूून शिक्षण बंद आहे. अशा बंद वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात चक्क सरपटणारे प्राणी वास्तव्यास येत आहेत. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिरच्या प्रयोगशाळेत एक भली मोठी धामण आढळली. येथीलच कर्मचारी व सर्पमित्र दत्ता सावंत यांनी तिला सुखरूप पकडून जीवदान दिले. लॉकडाऊननंतर शाळांमध्ये …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयांचे होणार लेखापरीक्षण

पनवेल : प्रतिनिधी – पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांना बिल आकारणीबाबत व रुग्ण सेवेबाबत काही निर्देश दिले आहेत. शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजना अंतर्गत रुग्णांना लाभ दिले जात असून असे लाभ संबंधित रुग्णास देण्याबाबतही रुग्णालयांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ती जबाबदारी खाजगी रुग्णालये पूर्ण करीत आहेत का नाही …

Read More »

वादळग्रस्तांना तातडीने मदत द्या; अंकिता प्रतीक दळवी यांची मागणी

मुरूड : प्रतिनिधी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नारळ-सुपारीच्या बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्या. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही बागायतदारांना नुकसानभरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. मदत वाटप करण्यास दिरंगाई होत असून, तातडीने पैसे वाटप करावे, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य अंकिता प्रतीक दळवी यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती बोलताना …

Read More »

संजयआप्पा ढवळे ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना कोविड योद्धा पुरस्काराने नुकतेच तळाशेत येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी कोरोना काळात जनतेला मदतीचा हात दिला असून, ते अविरत कार्यरत आहेत. या कार्यक्रमास भाजपचे अ‍ॅड. परेश जाधव, बाबूराव चव्हाण, विशाल …

Read More »

नेरळमध्ये अर्भक आढळले

कर्जत : बातमीदार नेरळमध्ये शुक्रवारी (दि. 3) सकाळी एक नवजात बालक आढळल्याची घटना घडली. पोलिसांच्या मदतीने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या या नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून, त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत. मूल नाही म्हणून अनेक दाम्पत्य मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, तसेच डॉक्टरांकडे नाना उपाय करीत असतात. त्यांची …

Read More »

माणगाव तालुक्यात सात नवे कोरोनाबाधित

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. यामध्ये नगरपंचायत हद्दीत दोन, मोर्बा येथे व इंदापूर येथेही प्रत्येकी दोन, तर कशेणे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. …

Read More »

नागावमध्ये कडकडीत बंद; जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद

रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायत हद्दीत जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून,  पहिल्याच दिवशी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला. कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नागावमध्ये 2 ते 6 जुलैदरम्यान बंद आहे. शेजारील गावात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल …

Read More »

भाजयुमोकडून डॉक्टरांचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्तडॉक्टर दिनाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेने तसेच तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील व विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांच्या साथीने पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे व कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील …

Read More »

पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन

अत्यावश्यक सेवांना सूट पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 3) रात्री 9 वाजल्यापासून 14 जुलैच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यासाठी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. …

Read More »

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्के विकसित भूखंड

पनवेल ः उरण वार्ताहरजेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के विकसित भूखंड देण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्‍या 12.5 टक्केभूखंड वाटपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागणीनुसार गुरुवारी (दि. …

Read More »