Breaking News

महत्वाच्या बातम्या

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून विकासकामे, नालेसफाईची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांची तसेच नालेसफाईची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह मंगळवारी (दि. 16) पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने आणि सिडकोने कोणती कामे केली पाहिजेत याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आठवड्यापूर्वी प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवकांजवळ चर्चा केली होती. त्यानुसार अधिकार्‍यांना काम करण्याबाबत सूचना देण्यात …

Read More »

पनवेलमध्ये माय लाईफ माय योगा 2020 स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ’माय लाईफ माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा पनवेल महापालिका क्षेत्रासाठी मर्यादित असून, सहा गटांत होणार आहे. प्रत्येक गटासाठी …

Read More »

लपवालपवी कशासाठी?

देशात दुर्दैवाने महाराष्ट्रातच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक होत असल्याचे चित्र एप्रिलपासून दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिकपणे, नियोजनबद्ध रीतीने पावले उचलण्याऐवजी कोरोनाचे रुग्ण व मृतांच्या आकड्यांचे घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आता पुरते उघड झाले आहे. कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हा आकड्यांचा खेळ? देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आणि अल्पकाळातच …

Read More »

महिला पोलिसाचे घर जळून खाक

खोपोली ः प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील श्रीरामनगर येथे ब्रह्मांडेश्वरी सोसायटी इमारतीमधील तळमजल्यावरील श्रद्धा संतोष लोखंडे या महिला पोलिसाच्या फ्लॅटला मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरातील रहिवाशांनी व अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली.   आगीचे कारण अद्याप समजले नाही. श्रद्धा लोखंडे सकाळी अंबरनाथ येथे ड्युटीसाठी घरातून निघाल्या. त्या …

Read More »

कोरोना योद्ध्यांच्या सेवेतील एसटी कर्मचारी पगारापासून वंचित

पनवेल ः प्रतिनिधी मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची वाहतूक करणार्‍या पनवेल आगारातील चालक आणि वाहकांचा एप्रिल महिन्यापासूनचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या खिशात घरून येण्यासाठीही पैसे नसल्याने कर्मचार्‍यांत असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील एसटीच्या इतर विभागातील कर्मचार्‍यांचे आणि अधिकार्‍यांचे पगार मात्र शासनाने दिलेल्या निधीतून करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली …

Read More »

नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीपासून बचावासाठी विविध उपाययोजना करणार्‍या वस्तूंचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त …

Read More »

उरणमध्ये आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उरण ः प्रतिनिधी उरण परिसरात मंगळवारी (दि. 16) कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी चाणजे-तांडेलनगर येथील दोन पुरुष, तीन महिला, तर बोरी येथील एक पुरुष व एक महिला असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोप्रोली येथील 38 वर्षीय रुग्णालाडिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची …

Read More »

पोलादपूर तालुका झाला कोरोनामुक्त!

संसर्ग टाळण्यासाठी दक्षतेचे आवाहन; सर्व यंत्रणांचे सहकार्य पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात 18 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे एकूण 21 रुग्ण आढळून आले. शेवटचे सात रुग्ण होम आयसोलेशन करून देखभाल व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि. 16) दुपारी अधिकृतरीत्या पोलादपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची …

Read More »

नाभिक समाजास व्यवसायाची परवानगी द्यावी; स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीची मागणी

पनवेल ः वार्ताहर राज्य सरकारने नाभिक समाजास व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. सदर व्यवसाय नाभिक समाज सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करेल. सध्या महाराष्ट्रात लाखो युवकांचे कुटुंब हे सलूनचा व्यवसाय करीत आहेत. केस कापणे, दाढी करणे …

Read More »

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजचे सुयश; ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये दोनशेच्या यादीत

मोहोपाडा ः प्रतिनिधी राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून जाहीर झालेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये टॉप दोनशेच्या यादीत सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आपले नाव नोंदविले आहे. सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि बीसीए या उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड, प्लेसमेंट, शिकवण्याची पद्धत, उत्कृष्ट निकाल, शिकवण्याची गुणवत्ता, शिस्त, पायाभूत सुविधा आणि परिणामी …

Read More »