Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत बळींची संख्या शंभरीपार

नवी मुंबई : बातमीदारकोरोनामुळे नवी मुंबईत बुधवारी (दि. 10) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा शंभरीपार जाऊन 101 झाला आहे, तर तब्बल 156 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हाही एक उच्चांक ठरला आहे. दुसरीकडे 67 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत …

Read More »

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रायगड जिल्हा दौर्‍यावर

चक्रीवादळातील नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून कोकणवासीयांना आधार देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौर्‍यावर येत आहेत. 11 व 12 जून असा त्यांचा दौरा आहे.विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या …

Read More »

तळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्ग 15 दिवसांत सुरू होणार

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्‍यांसमवेत पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्गाच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 10) सिडकोच्या अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. हा भुयारी मार्ग येत्या 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. यामुळे येथील नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळणार असून, परिसरातील …

Read More »

पनवेलमधील शिवरायांच्या पुतळ्याला मावळे, हत्तींचा साज

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक पनवेल : नितीन देशमुखपनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील उद्यानात मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने येथील चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून, पनवेलकर हे शिल्प पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. महापालिका सभागृह नेते …

Read More »

स्वत:ची काळजी घ्या

कोरोना विषाणूमुळे जगभरावर आलेले महामारीचे संकट अद्याप कायम आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्याकडील रुग्णांचा बरे होण्याचा दरही चांगला आहे. परंतु त्याचा अर्थ आपण बेफिकीरपणे वागू शकतो असा अजिबातच होत नाही. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढतो आहे. तेव्हा हे लक्षात ठेवून प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची काळजी घेणे …

Read More »

वशेणी-दादर खाडीपूल वाहतुकीस पुन्हा खुला

उरण : प्रतिनिधी वशेणी-दादर खाडीपूल आता वाहनांसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली असून या मार्गावरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कोकणपट्टीत पसरू नये यासाठी खारपाडा येथील महामार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. त्यामुळे अनेक वाहने या …

Read More »

भौतिकशास्त्र विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचा मुख्य विषय नॅनोमटेरियल्स फॉर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल एनर्जी सोल्युशनस असा होता. देश-विदेशातील चार हजारांहून अधिक प्राध्यापकांनी या वेबिनारमध्ये आपला सक्रिय …

Read More »

सार्वजनिक बांधकाम विभागाने बनविलेल्या वलप गणेशनगर रस्त्याची दुरवस्था; कामात अनियमितता; नागरिकांचा आरोप

कळंबोली : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी 70 लाख रुपये खर्चून बनवलेला वलप गणेशनगर रस्ता पावसाच्या सुरुवातीला वाहून गेल्याने वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. दोन दिवसांत रस्ता बनविला गेला नाही तर ग्रामस्थ …

Read More »

सुपारीची झाडे बाजूला काढण्यासाठी मशीन उपलब्ध करुन देण्याची मागणी

मुरुड : प्रतिनिधी – मुरुड तालुक्यात नांदगाव सर्वे काशीद भोईघर दांडा बरशिव व मुरुड शहर भागात वादळामुळे सर्वात जास्त सुपारीच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकपतिनिधींनी पाहणी केल्यानंतर बागायतदारांनी आता साफसफाईकडे आपले लक्ष वेधले आहे. सुपारीची पडलेली झाडे दोन भागात कापून एका बाजूला ठेवण्यात येत आहेत. परंतु यासाठी सरकारने कटर …

Read More »

कर्नाळा परिसरात वन्य प्राणी, पक्षांची थ्रीडी चित्रे

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमध्ये कर्नाळा अभयारण्य परिसरात वनक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून वन्य प्राण्यांसह पक्षांची थ्रीडी चित्र रेखाटण्यात आली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणार्‍यांना अभयारण्यातून गेल्याचा भास होणार असून सेल्फी पॉइंटही बनविला आहे. अभयारण्य परिसरात अगोदर 11 मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणाने तो 30 मीटर रुंदीचा …

Read More »