Breaking News

महत्वाच्या बातम्या

कळंबोली येथे बसला अपघात; एक जण गंभीर जखमी

पनवेल : वार्ताहर कर्नाटकमधून मुंबई ला प्रवाशी घेऊन चाललेल्या बसचा अपघात झाल्याची घटना सायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली वसाहती जवळ घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सगळ्या प्रवाशांवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. बसमध्ये 7 प्रवाशी होते त्यापैकी एक प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस विभागाकडून सांगितले जात आहे. …

Read More »

शेडुंग टोलनाक्यावर 57 हजारांचे मद्य जप्त; पाच जणांवर कारवाई

पनवेल : बातमीदार, वार्ताहर शेडुंग टोलनाका येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी दोन कारमधून 57 हजारांचे विदेशी मद्य जप्त केले. या वेळी पाच लाख रुपयांच्या दोन कार देखील जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे पनवेलमध्ये मद्यविक्री बंद आहे. त्यामुळे नागरिक पनवेलच्या बाहेरून मद्य आपल्या वाहनांमध्ये आणत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या आदेशानुसार …

Read More »

उरण नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी मोहीम

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये याकरिता उरण नगर परिषद यांच्या वतीने शहरात शनिवार व रविवार या दोन दिवस बाजारपेठ बंद ठेऊन सर्व ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. उरण शहरातील राजपाल नाका, जरीमरी मंदिर, फुल मार्केट, पेन्शनर पार्क आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. उरण तालुक्यातील …

Read More »

भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन सहसचिवपदी राहुल जाधव यांची नियुक्ती

खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी – भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांच्या संमतीने भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी भाजपचे युवा नेते राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू चौहान यांनी शुक्रवारी (दि. 15) पत्राद्वारे जाहीर केली. राहुल जाधव यांनी भाजपचे उमेदवार …

Read More »

शेतीकामासाठी यंत्रांचा आधार

झटपट कामे करण्यास शेतकर्‍यांची पसंती माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनला 50 दिवसांहून अधिक दिवसांचा काळ लोटला आहे. या दिवसांत शेतीसह अनेक कामे रखडली आहेत.शेतीकामांसाठी शेतकर्‍यांना सामाजिक दुरावा राखत काम करण्याची मुभा मिळाली आहे, मात्र पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लॉकडाऊनमुळे रखडली आहेत. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांकडून …

Read More »

महिला वकिलाचा विनयभंग; सात जणांवर गुन्हा दाखल

पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील महिला वकिलाचा घराच्या वादातून हात पिळत, मारहाण व अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 12) शिळोशी येथे घडली. या महिला वकील सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. या प्रकरणी संबंधितांना तत्काळ अटक न केल्यास पोलीस स्थानकासमोर आत्मदहन …

Read More »

महाड बाजारपेठेत अग्नितांडव; लाखोंचे नुकसान

महाड ः प्रतिनिधी – महाड बाजारपेठेतील चामुंडा एनएक्स या कापड दुकानाला रविवारी (दि. 17) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नगर परिषद, महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. आगीचे …

Read More »

पनवेल स्टेशनहुन 15 हजारांपेक्षा अधिक मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

पनवेल : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा, नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजूर, व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना करण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशकरिता पाच, झारखंड व उत्तरप्रदेशसाठी दोन, तर बिहार व ओडिशाकरिता प्रत्येकी एक रेल्वेगाडी सोडण्यात आली आहेत. स्वत:च्या राज्यात, …

Read More »

पनवेल तालुक्यात 20 नवीन रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 16) 20 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 17 जणांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेली आहे. महापालिका क्षेत्रात 12 रुग्ण आढळले. यात कामोठे येथील सात, खारघर आणि कळंबोलीतील प्रत्येकी दोन आणि तळोजातील एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात 246 रुग्ण झाले असून, 112 रुग्णांनी कोरोनावर …

Read More »

चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

माणगाव : प्रतिनिधीकोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात गेलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरात न थांबता चाकरमानी हे कुटुंबासह आपापल्या गावी परतत आहेत. शहरी भागांतून येणार्‍या कुटुंबांना साथीच्या या रोगापासून सुरक्षित करण्यासाठी व त्यांच्या संपर्कात ग्रामस्थ येऊ नयेत यासाठी ग्रामीण भागात खबरदारी …

Read More »