Breaking News

महत्वाच्या बातम्या

कामगारांची गावी जाण्यासाठी लगबग

सोशल डिस्टन्सिंगचे होतेय पालन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड आदी ठिकाणाहून आलेले कामगार व मजूर हे आता त्यांच्या स्वतःच्या गावी रवाना होत आहेत. यासाठी त्यांना पनवेल येथील रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी 12 एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या. आगारात सोशल डिस्टन्स …

Read More »

कर्जत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

कर्जत ः प्रतिनिधी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्याने कर्जत बाजारपेठेत लक्षणीय गर्दी वाढली आहे. शुक्रवारी बाजारपेठांमध्ये नागरिकांची आणि वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर ही गर्दी ओसरली. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास अचानक नगर परिषद प्रशासनाने अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सुरू असलेली दुकाने बंद करण्यास सांगितले आणि बाजारपेठेत …

Read More »

मुरूडच्या टेंभुर्डी परिसरात बिबट्याचा वावर

हल्ल्यात दोन बकर्‍यांचा मृत्यू रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील टेंभुर्डी आदिवासीवाडीत एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. फणसाड अभयारण्यालगत भोईघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टेंभुर्डी आदिवासीवाडीवर रात्रीच्या सुमारास तेथील रहिवासी संगीता वाघमारे यांच्या मालकीच्या दोन बकर्‍यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात …

Read More »

‘रोहयोतील कामांतून आदिवासींना रोजगार मिळावा’

पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या लॉकडाऊनला दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. यामुळे आदिवासी बांधवांचा रोजगार हिरावला आहे. सरकारकडून आदिवासी बांधवांना रेशन, अन्नधान्य दिले जात असले तरी त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केली आहे. काही महिन्यांपासून आदिवासी …

Read More »

तृणधान्यांचे आहारातील महत्त्व

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे स्थूल व्यक्तींना ‘होलग्रेन’ म्हणजेच तृणधान्ये खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप हे तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. उदाहरणार्थ, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी इत्यादी. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. एक म्हणजे बाहेरचे टरफल किंवा …

Read More »

मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग

दोन गायी, एक कुत्रा मृत्युमुखी; दोन गायींसह वासराला वाचविण्यात यश कर्जत ः बातमीदार लॉकडाऊन काळात नेरळ गावात मुक्या प्राण्यांना फॉरेट कीटकनाशक खायला घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेतून दोन गायी आणि एका वासराला वाचविण्यात प्राणिमित्रांना यश आले असून दोन गायी आणि एका कुत्र्याचा …

Read More »

आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. राज्यातले आदिवासी हे महाराष्ट्राच्या जनतेचा अविभाज्य भाग आहेत. आदिवासी भागातील लोक डोंगरावरती राहत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून नेक्स्ट व्हेंचर यांच्या सहकार्याने पनवेलमधील आदिवासी गरजू कुटुंबियांना किराणा …

Read More »

समाजसुधारक स्व. नानासाहेब पाटील

शेकापचे ज्येष्ठ नेते व परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब पाटील यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाविषयी आत्मियता असणारा, परंतु समाजातील जुन्या अनिष्ट रुढी, परंपरा झुगारून देऊन नव्या विकासात्मक विचारांची गुढी उभारणारा नेता आपल्यातून हरपला आहे. नानासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक सुधारणांचाच विचार केला. नुसता विचार …

Read More »

उलवे, कोप्रोली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे व कोप्रोली येथे एक एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उलवे येथील निल सिध्दी जोया सोसायटी, बी विंग, ही इमारत व कोप्रोली येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था, ई विंग, ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी …

Read More »

फुटपाथ, हातगाड्यांवरील फेरीवाले हटविण्यात यावे

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल येथील हातगाडी आणि फुटपाथवर अनेक भाजी व फळ विक्रेते उभे राहत असल्याने तेथे गर्दी होत आहे, कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता तेथे काही नागरीक खरेदीसाठी येतात. म्हणून हे फुटपाथवर बसणारे तसेच हातगाड्यांवर विकणार्‍या फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, …

Read More »