Breaking News

महत्वाच्या बातम्या

श्रमिक रेल्वेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात विविध व्यवसाय व कारखान्यातील परप्रांतीय मजुरांना काम नसल्याने त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे, परंतु त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कोणतीही वाहने उपलब्ध नसल्याने मजुरांची गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने  या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व शासनाच्या वतीने विशेष श्रमिक रेल्वे गाडी सुरू करण्यात आली …

Read More »

युरिक अॅसिड

आरोग्य प्रहर कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोड्या दिवसांत बरी होत नसेल तर युरिक अ‍ॅसिड वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अनेक तरुण, मध्यमवयीन व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. योग्य प्रकारे पथ्य अवलंबल्यास यातून कायमची सुटका मिळू शकते. युरिक अ‍ॅसिड वाढलेले असताना वा त्याची …

Read More »

खालापुरास पाणीटंचाईचे चटके

ग्रामस्थांचे हाल; टँकरने पाणीपुरवठा सुरू खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात खालापूर तालुक्याच्या पाचवीला पुजलेले पाणीटंचाईचे संकटदेखील घशाची कोरड वाढवत आहे. ठोस उपचारांअभावी टँकरची मात्रा सध्या देण्यात येत आहे. खालापूर तालुक्यात प्रचंड जलसाठा असतानादेखील पावसाळा संपताच अनेक भागात पाणीटंचाई जाणवते. या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात वर्षानुवर्षे प्रशासनाला अपयश येत आहे. खालापूर तालुक्याच्या …

Read More »

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही

मुंबई ः प्रतिनिधीअंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. युजीसीच्या निर्देशांनुसारच सगळे निर्णय घेण्यात येत आहेत. अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून 16 मजूर मृत्युमुखी

औरंगाबाद : प्रतिनिधीमध्य प्रदेशातील गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळावरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना मालगाडीने चिरडल्याने 16 जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबादजवळील बदनापूर-करमाडदरम्यान शुक्रवारी (दि. 8) सकाळी 6 वाजता हा भयंकर अपघात झाला. सर्व 19 मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊन सातत्याने वाढत असल्याने …

Read More »

पनवेल मनपाचा कोरोनाविरुद्ध लढा

स्थायी समितीने दिले प्रशासनाला आर्थिक बळ पनवेल : प्रतिनिधीकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतूनाशके, कीट व इतर साहित्य खरेदीला आणि तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्या सोबत लोकप्रतिनिधीही असल्याचे दाखवून दिल्याचे स्थायी समितीच्या सभेनंतर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. या सभेत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली …

Read More »

कामोठे भाजप युवा मोर्चातर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे ‘वक्ता महाराष्ट्राचा’ या आशयाखाली ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.  स्पर्धेसाठी ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब …

Read More »

संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण कामोठे हे कंटेन्मेंट झोन (कोरोना विषाणूबाधित क्षेत्र) म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 8) घोषित केले. कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी असून, लोकसंख्या 1.13 लाख आहे. येथे शुक्रवारअखेर 54 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 138 …

Read More »

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

पुणे : प्रतिनिधीराज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच या आठवड्यात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही राज्याच्या …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर

मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या 21 मे रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील अशा नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. पक्षीय बलाबलानुसार नवव्या …

Read More »