भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आर्थिक दृष्टीने पाहिले तर आपण खूप मोठी किंमत मोजली आहे, परंतु देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. गेले काही दिवस ते सातत्याने देशभरातील मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच आपण निवडलेला लॉकडाऊनचा मार्ग योग्यच होता, …
Read More »गरजूंना नाष्ट्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायण बाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने दररोज परिसरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मदत केली जाते. या मंदिर परिसरात असलेल्या झोपडपट्टीमधील नागरिकांना दररोज सकाळी चांगले दूध व नाष्टा मिळावा यासाठी मंंदिराच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत कोणत्याही प्रकारची गर्दी …
Read More »नागरिक करताहेत वारंवार एकच गुन्हा
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा फैलाव थोपवत स्टेज तीनमध्ये जाणे टाळायचे असेल तर सोशल डिस्टसिंग राखणे अत्यावश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने वारंवार या गोष्टीचा कंठशोष करण्यात येत आहे. असे असले तरीसुद्धा स्वतःला शिकले-सवरलेले म्हटलेल्या वर्गाकडून जर सोशल डिस्टसिंगचा भंग होणार असेल तर या लढाईला काहीही अर्थ राहणार नाही. …
Read More »गरजूंना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डवॉश
पनवेल : बातमीदार तळोजा येथील 102 बटालियन द्रुत कार्यबल यांच्याकडून गरजूंना कोरोना विषाणूच्या बचावासाठी हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश, हॅन्डग्लोज आणि फिनायल यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. या वेळी 102 बटालियनचे कमांडंट राजेश कुमार, उप कमांडंट मोहम्मद रजी, पनवेलचे तहसीलदार अमित सानप आणि मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे उपस्थित होते. या वेळी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
उरण : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 जयंती निमित्त उरण येथील बौधवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या वेळी बुद्धपूजा घेण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली …
Read More »‘रिलायन्सचे कार्य कौतुकास्पद’
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने संपूर्ण देश ग्रासला असून लाखो लोकांचा रोजगारच गायब झाल्याने अनेकांची उपासमार होत आहे. अशा वेळी येथील रिलायन्स कंपनीने नागोठणे विभागातील बहुतांशी आदिवासीवाड्या तसेच गावांमध्ये जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविल्याने हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांनी काढले. येथील रिलायन्स …
Read More »रेवदंड्यात परप्रांतीय कामगाराचा दफनविधी; सामाजिक कार्यकर्त्याने जपली माणुसकी
रेवदंडा ः प्रतिनिधी सध्या जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अशातच रेवदंड्यात वास्तव्यास असलेला एक परप्रांतीय नेपाळी मृत पावला, मात्र लॉकडाऊनमुळे त्याच्या कुटुंबीयांना कळविणे व मृतदेह नेपाळमध्ये पाठवणे जिकिरीचे काम होते. या वेळी रेवदंड्यातील सामाजिक कार्यकर्ते सलीम तांडेल यांनी पुढाकार घेऊन या परप्रांतीय बांधवाचा दफनविधी …
Read More »अलिबाग ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार (सर्वसाधारण) सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारीही उपस्थित …
Read More »म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींतील 10 हजार 369 घरांचे सर्वेक्षण पूर्ण
म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमधील 10,369 घरांतून विविध निकषाने सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती पं. स. गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी वाय. एन. प्रभे यांनी दिली. तालुक्यातील आंबेत, रोहिणी, आडी, महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव (बु.) पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव (खुर्द), कणघर, लेप, कोळे, …
Read More »कोरोनाच्या संशयावरून दमदाटी
पेण ः पेणमधील आनंदनगर येथे कोरोना प्रादुर्भावाच्या संशयावरून जमावाकडून एका दाम्पत्याला घराबाहेर काढून दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली. रविवारी सकाळी फिर्यादी रा. आनंदनगर रामवाडी, पेण यांचे पती हे 25 मार्चपासून रजेवर होते. ते फिर्यादी राहत असलेल्या रामवाडी या ठिकाणी राहण्यास आले असता त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असा गैरसमज करून सोसायटीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper