Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण येथून कॅनडीयन व्यक्ती विलगिकरण कक्षात

उरण : प्रतिनिधी ब्रेन डॉग्लास स्तील या दुबई येथून आलेल्या एका कॅनडा येथील संशयास्पद कोरोना रुग्णास ताब्यात घेऊन त्याला काल बोकडविरा-उरण  येथील केअर पॉईंट रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती ओएनजीसी येथे कंत्राटी काम घेत असल्याचे सांगण्यात येते. 12 तारखेला दुबईतून ही व्यक्ती मुंबईत वास्तव्याला होती. 22 …

Read More »

उरणमध्ये नगरपरिषदेतर्फे जनजागृती

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूबद्दल अधिक माहिती व्हावी, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी त्यासबंधी उरण शहरात बॅनर लावलेल्या गाड्या फिरविल्या जात आहेत. उरण शहरात धुरांडी करण्यात येत आहे. जंतूनाशक फवारणी सुरु आहे. किराणा मालाच्या दुकाना समोरील बाजूस तीन फुट चौरस अशी …

Read More »

शासकीय आदेशाची अवहेलना केल्यावर गुन्हा दाखल

उरण : वार्ताहर कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत महाराष्ट्र व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सादर केलेल्या आदेशाची अवहेलना करून दुकानात गिर्‍हाईकांची गर्दी करून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याचा आदेश असताना थंडपेयाची  विक्री करीत असताना मिळून आला तसेच किराणा दुकानात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध असताना लोकांची सुरक्षितता धोक्यात घालून विक्री करीत असताना मिळून …

Read More »

नगरसेविकेच्या दिरावर बलात्काराचा गुन्हा

पनवेल : बातमीदार शिवसेनेच्या सीबीडीतील नगरसेविका सरोज पाटील यांचा दीर नीळकंठ पाटील याने त्याच्या ओळखीतील अनुसूचित जातीच्या 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची तक्रार बदलापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. हा प्रकार सीबीडी परिसरात घडला असल्याने बदलापूर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा पुढील तपासासाठी सीबीडी पोलीस ठाण्यात वर्ग केला. पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटी …

Read More »

उरणमध्ये ग्रामपंचायतींचा गावबंदीचा निर्णय

उरण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 21 दिवसांचे लॉक डाऊन व घराबाहेर पडण्यास मनाई करण्याच्या आवाहनानंतर उरण परिसरातील काही गावांतील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने गावबंदी लागु केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 21 दिवसांचा लॉक डाऊनच्या आवाहनाला नागरिकांनी …

Read More »

मराठी नववर्षाचे स्वागत घरात बसूनच

पनवेल : वार्ताहर गुढीपाडवा हा वर्षात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो तसेच आजचा दिवस हा मराठी नववर्ष दिवस म्हणूनसुद्धा मानला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे पनवेलकरांनी या दोन्ही सणांचे स्वागत घरात बसूनच केले. गुढीपाडवा व मराठी नववर्ष म्हणजे आनंदाचा उत्सवच असतो. या निमित्ताने घराघरातून गुढ्या उभारणे, शोभायात्रा, मिरवणुका यात …

Read More »

कर्फ्यूमध्येही पनवेलमधून अवैध वाहतूक सुरूच

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (दि. 24) शासनाने जाहीर केलेल्या कर्फ्यूला बर्‍यापैकी पाठिंबा मिळाला. भाजीपाला पुढील काही दिवस मिळणार नाही या भीतीने लोकांनी भाजी मार्केटमध्ये गर्दी केली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी एसटी सेवा दादरपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. खाजगी अवैध वाहतूक सुरू असल्याने गावाला जाण्यासाठी पूलाखाली कर्फ्यू असतानाही …

Read More »

पनवेलमध्ये पोलिसांकडून अन्नदान

पनवेल : बातमीदार : कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पनवेल परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला बेघर असलेल्या भुकेल्या पोटासाठी पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी पुढाकार घेतला असून पनवेल परिसरातील बेघरांना अन्नदान केले.  कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

परप्रांतीय भाजी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

संचारबंदी असतानाही दुकानासमोर पडदा लावून भाजी विकण्याचा प्रकार उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्य व्हायरसचे जंतू पसरू नये यासाठी राज्य सरकारने अखेर संचारबंदी लागू केली असून, प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असताना, उरण तालुक्यातील चिरनेर, कोप्रोली नाक्यांवर परप्रांतीय भाजी विक्रेत्यांकडून दुप्पट रकमेच्या भावाने ग्राहकांची लूट करीत आहेत. नवी मुंबई …

Read More »

सावळ्यातील फार्म हाऊस सोसायटीमधील पाणीपुरवठा आणि वीज कोरोनामुळे कापली प्रशासन धावले मदतीला

कर्जत : बातमीदार  : तालुक्यातील सावळा येथे 40 वर्षांपूर्वी फार्म हाऊस सोसायटी उभी राहिली. या फार्म हाऊसचे बहुतेक मालक सध्या तेथे राहून आहेत. कोणी अज्ञात लोकांनी या सोसायटीची वीज तोडली, त्या ठिकाणी जाणारे रस्ते बंद केले आणि तेथील पाणीपुरवठाही बंद केला होता. दरम्यान, तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन …

Read More »