नवी मुंबई, पनवेल : बातमीदार वीज ही अत्यावश्यक सेवा असून लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी हे वीजपुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत. खारघर येथील डीजी पोळ फाऊंडेशनतर्फे निमिषा रुग्णालयात, सेक्टर 4 येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासाठी महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पनवेल शहर विभागाचे …
Read More »अत्यावश्यक सेवेत मोडणार्या कंपन्यांनी कामगारांना विमाकवच द्यावे; भाजपची मागणी
रसायनी : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रसायनी पाताळगंगा औद्यागिक क्षेत्रात मोडणार्या ज्या काही अत्यावश्यक सेवा पुरवणार्या कंपन्या सुरु आहेत, त्या कंपन्यानी आपल्या कामगारांना 50 लाख विमाकवच द्यावे अशा मागणीचे आमदार महेश बालदी यांचे पत्र भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित कंपन्यांना दिले. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाचे संकट हे संपूर्ण देशभर अतिशय गंभीर …
Read More »विनाकारण फिरणार्या वाहनांवर जप्तीची कारवाई
अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात प्रेमाने सांगून, फटके देऊनही लोक ऐकत नाहीत. विनाकारण रस्त्यावर वाहने फिरवणार्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अखेर रायगड पोलिसांनी आता वाहनजप्तीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. यात शेकडो वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. रायगडात ठिकठिकाणी सुरू असलेल्या नाकाबंदीत गुरुवारी (दि. 2) वाहनांची कसून तपासणी केली जात …
Read More »मुंबईहून येणार्यांचा धोका वाढला; चाकरमानी पायी चालत पोहचले गावी
महाड ः प्रतिनिधी संपूर्ण देशात संचारबंदी असल्याने प्रवासी वाहने बंद आहेत. त्यातच मुंबई-पुणेसारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोकणातील चाकरमानी भयभीत होऊन आपल्या गावी परतू लागले आहेत. जिल्ह्यात अनेक गावांत हे चाकरमानी पायी चालत येत असून यामुळे धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदी असताना जिल्हा हद्दीतच या नागरिकांना ताब्यात घेतले …
Read More »पोलिसांसाठी सॅनिटायझरचे वाटप
पनवेल : क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन, कामोठे पोलीस स्टेशन, कळंबोली पोलीस स्टेशन तसेच आसूडगाव वाहतूक शाखा चौकी, कळंबोली वाहतूक शाखा चौकी व मॅकडोनाल्डजवळील बंदोबस्त करीत असलेले अधिकारी व कर्मचार्यांना सॅनिटायझरचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा रुपाली शिंदे, निकेशा केमिकल्स प्रा. लि.चे प्रोप्राईटर मृगेश दोषी यांनी वाटप केले. …
Read More »‘रोटरी’तर्फे पनवेलच्या क्राईम ब्रँच युनिटला मास्क, सॅनिटायझर
पनवेल : वार्ताहर आजच्या काळामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून ते 24 तास कर्तव्य बजाविण्यासाठी रस्त्यावर असतात. या वेळी त्यांना अनेकांशी संपर्क येतो. यातून कोरोनासारख्या विषाणूंचा प्रादूर्भाव त्यांना होऊ नये म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने क्राईम ब्रँच युनिट-2 पनवेलच्या पथकाला मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. क्राईम ब्रँच युनिट-2, पनवेलचे वरिष्ठ …
Read More »पनवेलच्या रेशन दुकानांत धान्याचा पुरेसा पुरवठा
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार लॉकडाऊनदरम्यान पनवेल तालुक्यातील रेशन दुकानात गहू आणि तांदूळ यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आलेला आहे. आठवड्याभरात सर्व दुकानांमध्ये रेशनचे धान्य पोहचवली जाईल, आता साखर देखील उपलब्ध होईल, अशी माहिती पुरवठा अधिकार्यांनी दिली आहे. पनवेल तहसील हद्दीत येणार्या एकूण 193 रेशन दुकानांपैकी 60 दुकानांमध्ये गहू आणि तांदूळ यांचा …
Read More »अन्नदानादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पायदळी; गुन्हे दाखल करण्याचे आदेश
पनवेल : प्रतिनिधी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्याने गरीब, गरजू लोकांना अन्न देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या, पण ही मदत करताना काहींनी आपण सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवत असल्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल रेल्वेस्थानक व इतर ठिकाणी रोज गरजूंना …
Read More »लायन हार्ट ग्रुपकडून भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी उपक्रम
पनवेल : वार्ताहर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व विरेद्र यशवंत म्हात्रे यांच्या माध्यमातून भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाण्याचे वाटप नेरुळ रेल्वेस्थानक व नेरुळ जिमखानाजवळ सेक्टर-28 येथे करण्यात आले. जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतच आहोत. परंतु या समाजात कित्येक कुटुंबे …
Read More »अंकिता वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक धान्यसाठा वाटप
खारघर : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा शहरच्या माजी उपाध्यक्षा अंकिता वारंग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता 12 गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक धान्यसाठा दिला.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper