पनवेल : वार्ताहर आज जगभरात व आपल्या देशामध्येही कोरोनासारख्या महारोगराईने थैमान घातले आहे. पनवेलमध्ये ही काही प्रादुर्भाव झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन गरजे खातर त्यांना दूध, फळे, भाजीपाला सारख्या गोष्टी खरेदी करण्यासाठी घरा बाहेर पडावे लागत आहे. ही बाब भाजप …
Read More »आदिवासींचे जनजीवन विस्कळीत; लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची मागणी
पनवेल : बातमीदार देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. याचा परिणाम प्रत्येकावर होत आहे. पनवेल तालुक्यातील लॉकडाऊनचा परिणाम आदिवासी समाजावर देखील होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाकडून जीवनावश्यक मदतीची अपेक्षा आदिवासी समाजाकडून केली जात आहे. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत आहेत. बाजूच्या गावांमध्ये मजुरी करायची तसेच लाकडे फोडायची व त्या …
Read More »रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर शुकशुकाट
रेवदंडा ः प्रतिनिधी – कोरोनाशी मुकाबल्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा काम करीत असल्याचे चित्र दिसत असतानाच ग्रामस्थांनाही आता कोरोनाचे गांभीर्य लक्षात आल्याने रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर रहदारीविना शुकशुकाट दिसून येत आहे. रायगड जिल्हाधिकार्यांनी दोन चाकी, चारचाकी वाहनांस पासव्यतिरिक्त फिरण्यास बंदी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले व विनाकारण रस्त्यावर फिरणार्या लोकांना घरातच बसून राहावे …
Read More »मैदानातील बाजारात पोलिसांचा खडा पहारा
काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरळ बाजारपेठ बंद करून पोलिसांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार सुरू केला आहे. तेथे सोशल डिस्टन्स ठेवून भरवण्यात येत असलेल्या भाजीपाला, फळे, दूध, कांदा-बटाटा बाजारात कोणीही जादा दर आकारून लूटमार करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. दरम्यान, नेरळमध्ये आता …
Read More »अनावश्यक फिरणार्यांवर कर्जत पोलिसांची करडी नजर
कडाव ः प्रतिनिधी – संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांनी अनावश्यक फिरणार्यांवर कडक पहारा ठेवला आहे. त्यात रायगडातील कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारीही एक पाऊल पुढे टाकत आपले कर्तव्य बजावत आहेत. काही नागरिक लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे खुलेआम बाइकस्वारी करीत होते. त्यामुळे या नागरिकांना कर्जत पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला …
Read More »कोरोनाला रोखणारच; खोपोलीकरांचा संकल्प
कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली ः प्रतिनिधी – महाभयानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशस्तरावर लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. खोपोली शहर व परिसरात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही हा एक प्रकारचा दिलासाच आहे, मात्र लॉकडाऊन व कर्फ्यू असूनही काही नागरिक, तरुण शहरात रस्ते व अन्य ठिकाणी विनाकारण …
Read More »पनवेल येथे कोविड रुग्णालय सज्ज
अलिबाग : जिमाकापनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना कोविड-19 रुग्णालयाची स्थापना करण्यात आली असून, हे 120 खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप, जिल्हा शल्यचिकित्सक …
Read More »वरळी कोळीवाडा पोलिसांकडून सील
कोरोनाचे चार संशयित रुग्ण आढळल्याने खबरदारी मुंबई : प्रतिनिधीकरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या चार संशयितांपैकी एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही. यातील एक ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करीत होता, इतर तिघे …
Read More »वीज दरात मोठी कपात
राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मुंबई : प्रतिनिधीराज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचे नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10 ते 12 टक्के आणि औद्योगिक दरात 10 ते …
Read More »विशेष गटांची स्थापना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे पाऊल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात एक हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून, मृत्यू झालेल्यांचा आकडा 30च्या घरात पोहोचला आहे. या संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची स्थापना केली आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper