Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल महापालिकेकडुन 385 लाभार्थ्यांना परिवहन योजनेचा लाभ

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांना परिवहन योजनेअंतर्गत यावर्षी आत्तापर्यंत 385 लाभार्थ्यांनी बस भाडे सवलतीचा लाभ घेतला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बस भाडे सवलत योजना’ नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमांच्या साहाय्याने 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता राबविली जाते. या …

Read More »

ट्रेनमधून मद्याची वाहतूक

पनवेल रेल्वे स्थानकात देशी-विदेशी साठा हस्तगत पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकात आलेल्या केरळ संंपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आरपीएफ पनवेलच्या पथकाने तीन अनोळखी बॅगा हस्तगत केल्या असता त्या बॅगेमध्ये देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आल्याने तो ताब्यात घेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आज आरपीएफ पनवेल निरीक्षकांना गुप्त …

Read More »

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणार्‍यास महाडमधून अटक

महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एकाला महाड येथून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या महाड नवेनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्रशांत पाटील याने रविवारी रात्री …

Read More »

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कर्जतमधील तरुणास अटक

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील दामत येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानकारक तसेच मुघल बादशहा औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले …

Read More »

खालापूरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; मांगूर पालन करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

खालापूर ः प्रतिनिधी तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगूर मत्स्यपालन विरोधात खालापूरमधील ग्रामस्थ, शेतकरी शिवलिंग वाघरे यांच्यासह पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा मत्स्य विभागाने सोमवारी (दि. 10) महड, धामणी परिसरातील तलावावर धडवक कारवाई केली. सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील, उपायुक्त चेतन निवलकर, सोनल तोडणकर, खोपोली सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी अजया …

Read More »

पंतप्रधान मोदींमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन नागोठणे विभागातील कार्यकर्ते भाजपमध्ये नागोठणे : बातमीदार राजकारणात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती पहिल्या, केव्हा केव्हा तर वाटले राजकारणात का आलो? परंतु 2014 सालापासून देशाचे राजकारण बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे राजकारण करून देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन घडवित आहेत. त्यामुळे जनतेचा पंतप्रधानांवर विश्वास निर्माण झाला आहे, …

Read More »

पनवेलमधील नेरे-मालडुंगे रस्त्याचा होणार विकास

मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील नेरे ते मालडुंगे रस्ता सुधारणेचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाले. मालडुंगे …

Read More »

कामोठ्यातील रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे रविवारी (दि. 9) बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन ‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते …

Read More »

पनवेल परिसरात चोरीच्या घटना वाढल्या

कंपनीमध्ये चोरी करणार्‍या चौकडीला अटक पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पळवणार्‍या चार जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घरफोडीतील काही ऐवज हस्तगत केला आहे. या गुन्ह्यामध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सुद्धा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी …

Read More »

लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा

कृती समितीची मागणी; 9 ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलक पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करुन घ्यावा, अशी एकमुखी मागणी येथे …

Read More »