पनवेल : रामप्रहर वृत्त बॉक्सिंग खेळातील हिट इंडिया स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूलची विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य मुंबई सीटी बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने चेंबूर येथे आयोजित हिट इंडिया राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक जिंकले. …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिन आणि पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल चेस असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा 8 मार्च रोजी अध्यापक महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने खेळली जाईल. प्रत्येक गटात 10 पारितोषिके, तर सर्व सहभागी खेळाडूंना …
Read More »खाडेपाड्याची शाळा झाली वातानुकूलित
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील खाडेपाडा गावातील प्राथमिक शाळा वातानुकूलित झाली आहे. यानिमित्ताने रायगडमधील जिल्हा परिषदेची वातानुकूलित आणि वायफाय शाळा म्हणून खाडेपाडा शाळेचा गौरव झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे म्हणून खाडेपाडा ग्रामस्थांनी गावातील प्राथमिक शाळेला एक संगणक भेट दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेला वायफाय सेवा …
Read More »पांड्या ऑन फायर!; 20 षटकारांसह ठोकले दीडशतक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय संघाचा तडाखेबाज अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या नुकतीच 37 चेंडूंत शतकी खेळी केल्याने चर्चेत आला होता. ही चर्चा थांबण्याआधी पांड्याने एक नवा पराक्रम केला. त्याने डॉ. डी. वाय. पाटील टी-20 स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळताना 55 चेंडूंत नाबाद 158 धावांची खेळी केली. दुखापतीमुळे पांड्या गेले …
Read More »कर्जतच्या टोईंग व्हॅनला ब्रेक
कर्जत ः प्रतिनिधी कर्जतमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर तोडगा म्हणून मध्यंतरी येथे टोईंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू लागला, मात्र कराराची मुदत संपल्याने टोईंग व्हॅन बंद करण्यात आली. नगरपरिषदेने पाच वेळा निविदा काढूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरितच राहिला …
Read More »पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांसाठी पंचायत समितीचा पुढाकार
आवश्यक निधीबाबत अहवाल बनविण्याचे काम सुरू खोपोली ः प्रतिनिधी मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास प्रारंभ होतो. वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दुर्गम व उंचावरील वाड्या, वस्त्या व काही गावांत दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. मागील वर्षी उन्हाळ्यात खालापुरात 18 गावे व 39 वाड्या, वस्त्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा उशिरापर्यंत पडलेला …
Read More »कोकणच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक
कोकणचा कॅलिफोर्निया आणि कोकण विकासासाठी आलेल्या, पण अखर्चित राहिलेल्या करोडो रुपयांचा अनुशेष (बॅकलॉग) या दोन ठळक मुद्द्यांवर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून आजतागायत कोकणच्या विकासाच्या चर्चेचे गुर्हाळ सतत चालू आहे. गेल्या काही वर्षांत या मुद्द्यामध्ये पर्यटन विकास हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेडी बंदरातून गेल्या अनेक वर्षांपासून कच्चे खनिज या …
Read More »शब्द बापुडे केवळ वारा
कृषी क्षेत्रात गतसाली 1 टक्क्याची वाढ दिसत असल्याने त्याचे श्रेय तीन महिन्यांपूर्वी कसेबसे सत्तेत आलेल्या नव्या सरकारला घेता येणार नाही. तसेच बांधकाम क्षेत्राने देखील काहिशी उभारी घेतल्याची चिन्हे दिसत आहेत. या दोन्ही क्षेत्रांत विकासवृद्धी दिसावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी कामगार सुरक्षेसाठी आग्रही; तळोजा एमआयडीसीसंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी कामगारांची सुरक्षा जपा, असे शासनाला सूचित केले. तळोजा एमआयडीसीत सन 2016-2017, सन 2017-2018 व सन 2018 ते …
Read More »कर्जत भाजपचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार
कर्जत : विजय मांडे भाजप कर्जत शहर कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार आहे. कर्जत शहर महिला कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ सहसंयोजिका सरस्वती चौधरी, कर्जत शहर उपाध्यक्ष गायत्री परांजपे, नगरसेविका स्वामिनी मांजरे आणि विभागप्रमुख लीना गांगल यांनी कर्जत येथील महिला मंडळाच्या विद्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper