5th March 2020
महत्वाच्या बातम्या
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नूतन निवासस्थानाची वास्तुशांती आणि श्री सत्यनारायणाची पूजा गुरुवारी झाली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी मनोभावे दर्शन घेतले.
Read More »
5th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : शेलघर येथील महिलेचे कारसह अपहरण करून तिची गोळ्या घालून हत्या करणार्या आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अशोककुमार मुरगन कोनार (वय 42, उलवे) असे आरोपीचे नाव असून, त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Read More »
5th March 2020
मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सीबीआयने ठाण्याजवळील खारेगाव खाडीतून शोधून काढले आहे. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्यांनी ही माहिती दिली. पुण्यात 2013मध्ये दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला चालले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली …
Read More »
5th March 2020
पनवेल-उरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पनवेलकरांना हा अर्थसंकल्प काय देणार याबाबत उत्सुकता लागली आहे. पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सकाळी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख हे स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांना सादर …
Read More »
5th March 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : प्रतिनिधी देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सर्व अत्यावश्यक आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्यात अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले नसले तरी देशातील …
Read More »
5th March 2020
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
सिडनी : वृत्तसंस्था आयसीसी टी-20 महिला वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम लढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने गुणांच्या निकषावर भारत अंतिम फेरीत दाखल झाला, तर दुसर्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच धावांनी पराभव करीत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक …
Read More »
5th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर हद्दीतील बेलडोंगरी, बापूजीदेव परिसरातील डोंगरांना आगी लागून झाडेे-झुडप आगीत खाक झाली आहेत. यामध्ये पक्षाची घरडी अंडी छोटे-छोटे पक्षी होरपळून उध्वस्त झाले आहेत. मात्र वनविभागाच्या अधिकार्यांकडून या लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचाच …
Read More »
5th March 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
कृतियुक्त शिक्षणाचा आनंददायी अनुभव पनवेल : प्रतिनिधी आठवडी बाजार तर सगळीकडे नेहमीच भरतो. त्यावरून आपल्या महापालिका हद्दीत वाद ही सुरू आहेत पण उसर्ली खुर्द येथे भरलेल्या बाजारात मात्र आठवडी बाजारात मिळणार्या सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला होत्या, खरेदीला गिर्हाईकांची गर्दी होती. येथे भांडणे नव्हती की, गिर्हाईकांची फसवणूक नव्हती आणि हो येथे …
Read More »
5th March 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
रेवदंडा : प्रतिनिधी राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत बुधवारी (दि. 4) कंपनीच्या अग्नीशामक व सुरक्षा विभागाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कंपनी हेड पंकज मलिक यांच्या हस्ते झेंडा फडकवून या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीने गेेले दोन वर्ष अपघाताची संख्या शून्य …
Read More »
5th March 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांचे आवाहन नवी मुंबई : जिमाका कोरोना विषाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधसाठी कोकण विभागात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष हे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेने याबाबत दक्षता घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन …
Read More »