Breaking News

महत्वाच्या बातम्या

आता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका

मुंबई : प्रतिनिधीश्रीलंकेला टी-20 मालिकेत पराभूत करणार्‍या भारतीय संघाचा सामना आता तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांतील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि. 14)पासून सुरुवात होत असून, पहिली लढत मुंबईत रंगणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने गतवर्षीच्या शेवटी वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी-20 मालिकेत धूळ चारली. त्यानंतर …

Read More »

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीकर सरसावले; भव्य रॅली

खोपोली : प्रतिनिधीकेंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) लोकसभेत व राज्यसभेत संमत केले आणि त्याचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि. 12) जागरूक नागरिक मंचाच्या वतीने खोपोलीत भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी …

Read More »

सीकेटी विद्यालयात ‘वाद्य आविष्कार’

स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि. 11) उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलनात ‘वाद्य आविष्कार’ या शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे चेअरमन, …

Read More »

आम्ही धमक्यांना घाबरत नाही : देवेंद्र फडणवीस

अकलूज : प्रतिनिधीआम्ही कसल्याही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावेत, आम्ही चौकशीला तयार आहोत, असे चोख प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.फडणवीस रविवारी (दि. 12) अकलूज येथे आले होते. या वेळी त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप …

Read More »

‘सीएए’वरून तरुणांची दिशाभूल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा कोलकाता : वृत्तसंस्थानागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला असून, तो नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 12) येथे केले. जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी …

Read More »

‘शिवसेनेचे 35 आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज’

ठाणे : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचे 56 पैकी 35 आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अकार्यक्षम असल्याने भाजप पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त राणे ठाण्यात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी …

Read More »

युद्धाच्या उंबरठ्यावर

इराण आणि अमेरिका यांच्यातील धुमश्चक्रीमध्ये तिसर्‍या महायुद्धाची बीजे काही युद्धतज्ज्ञांना दिसू लागली आहेत. त्यात तथ्य देखील आहे. कारण या युद्धाने उग्र स्वरुप धारण केल्यास अन्य देश त्यात आपोआप ओढले जातील व सारे जग त्या आगीत होरपळेल अशी चिंता जगातील नेते मंडळींना वाटू लागली आहे. अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये सुरू …

Read More »

मटण दरवाढ; खाटीक जात नष्ट होण्याची भीती

मांसाहार करणार्‍यांच्या ताटात मटण असते आणि आपल्या भागातील मटण दराबाबत निर्माण झालेले संभ्रम लक्षात घेता मटण दरवाढ अपरिहार्य बनली आहे. राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि त्याचवेळी परराज्यातील विक्रेते यांच्याकडून बोकडांची चढ्या भावाने केली जाणारी खरेदी तसेच परदेशात थेट जिवंत बोकडांची होत असलेली निर्यात यामुळे मटणाचे दर  वाढण्याची शक्यता अपरिहार्य बनली …

Read More »

ग्रामीण व्यवसायाला चालना देणारे ‘रायगड सरस’

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल मधील गुजराती शाळा मैदान, पटवर्धन हॉस्पिटल समोर भव्य रायगड सरस 2020  प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे 9 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनाना योग्य …

Read More »

श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, नगरसेवक प्रविण काळूराम पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2019 हे वर्ष खारघर गावासाठी अतिशय दु:खदायक ठरले. वर्षभरात गावातील एकूण 15 व्यक्तींचे निधन झाले असून, त्यातील बर्‍याच व्यक्तींचे मृत्यू हे अकस्मात झाले. त्यामुळे या श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »