पनवेल : बातमीदार दादर (मुंबई) येथील महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठानच्या वतीने अमरकोश पठण स्पर्धा गेली 17 वर्षे आयोजित करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी, उच्चारण व पाठांतराचे संस्कार व्हावेत या हेतूने प्रामुख्याने ही स्पर्धा दादर, डोंबिवली आणि पनवेल अशा केंद्रांमध्ये भरवण्यात येते. को. ए. सो. …
Read More »मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती
पनवेल : वार्ताहर मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पनवेल शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 7) फेरी काढून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’ची पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रभागातील सर्वांनी सहभाग घ्यावा व …
Read More »महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती
पनवेल : वार्ताहर महामार्गावरील अपघात थांबावेत यासाठी महामार्ग पोलिसांकडून वाहनचालक व प्रवाशांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली असून, हे पोलीस पथक ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करीत आहे. या पथकाने सोमवारी (दि. 6) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा नाका येथील थांब्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणार्या इको व मिनीडोर चालकांमध्ये जनजागृती केली. …
Read More »सीकेटी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची साद
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित आयोजित श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन 18 ते 24 डिसेंबरदरम्यान नेरे शांतिवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले होते. युवकांनी ग्रामविकासाबरोबर देशाच्या विकासात सकारात्मक द़ृष्टी ठेवून …
Read More »वैभव जाधव ‘कनिष्ठ मुंबई श्री’
मुंबई : हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करीत कनिष्ठ मुंबई श्री या किताबावर नाव कोरले. दिव्यांगांच्या मुंबई श्री स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली, तर फॉर्च्युुन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने नवोदित मुंबई श्री हा मान मिळविला. मालाड पूर्वेला झालेल्या या …
Read More »कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून दुसरे स्थान भक्कम
दुबई : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत निर्भेळ यश संपादन करणार्या ऑस्ट्रेलिया संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेत आपले दुसरे स्थान अधिक भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेंतर्गत 10 सामने खेळले असून, यापैकी सात सामन्यांत कांगारूंनी विजय मिळवला आहे. त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला असून, दोन …
Read More »केगाव संघ समर्थ चषकाचा मानकरी
उरण : वार्ताहर तालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर खेळल्या गेलेल्या समर्थ चषक क्रिकेट स्पर्धेत केगाव क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. कोप्रोली संघ उपविजेता ठरला. या दोन दिवसीय स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश होता. आमदार महेश बालदी यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. विजेत्या केगाव संघाला 1,01,111 रुपये व भव्य चषक, तर उपविजेत्या …
Read More »नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा ‘महाराष्ट्र केसरी’
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मंगळवारी (दि. 7) मात करीत मानाची गदा पटकावली. पुण्याच्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली …
Read More »‘अंकुर’ने जिंकला चिंतामणी चषक
मुंबई : प्रतिनिधी अंकुर स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. लालबाग येथील सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकुर स्पोर्ट्स क्लबने चुरशीच्या लढतीत विजय क्लबचे आव्हान 28-24 …
Read More »नेरळ गावातील रखडलेल्या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी
स्थानिकांचे 20 जानेवारीपासून आमरण उपोषण कर्जत : बातमीदार नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने निधी दिला आहे. या निधीमधून करण्यात येणार्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. हे काम त्वरीत पुर्ण करावे, यासाठी स्थानिक रहिवासी सुभाष नाईक 20 जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी रायगड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper