Breaking News

महत्वाच्या बातम्या

एचआयव्हीची लागण असल्याचे लपवून विवाह; पत्नीलाही बाधा झाल्याने पतीविरोधात गुन्हा दाखल

पनवेल  : बातमीदार तरुणाने स्वत:ला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती लपवून ठेवून कामोठे भागात राहणार्‍या 26 वर्षीय तरुणीसोबत विवाह केल्याने वर्षभरातच या तरुणीलादेखील एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कामोठे पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून एचआयव्हीग्रस्त तरुणासह त्याच्या नातेवाइकांवर फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या …

Read More »

वाढत्या औद्योगिकरणात उरणची घोडदौड, स्थानिकांना रोजगाराच्या संधींची उपलब्धता; विकासकामेही प्रगतिपथावर

उरण : जीवन केणी उरण तालुक्यात वाढत्या ऐद्योगिकीकरणामुळे नागरिकरणात झपाट्याने वाढ होत आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून संबोधल्या जाणार्‍या उरण तालुक्याच्या ठिकाणी जेएनपीटीच्या अनुषंगाने विविध बंदरे कार्यान्वित झाली असून, तालुका आयात निर्यातीचे केंद्र बनले आहे. ठिकठिकाणी मोठमोठी गोदामे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी …

Read More »

रुद्राक्षी टेमकरकडून रेवस-गेट वे मोहीम फत्ते

उरण : बातमीदारप्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रुद्राक्षी टेमकर या एका नऊ वर्षीय मुलीने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमीचे सागरी अंतर अवघ्या आठ तासांत पोहून पूर्ण केले आहे. जोरदार वारा व उंच लाटांचा प्रतिकार करीत तिने आपले लक्ष साधले. रुद्राक्षी ही शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट विद्यालयात …

Read More »

पिरकोन येथे श्री समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा

उरण : वार्ताहरतालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष रवि भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत यांच्या उपस्थितीत झाले.स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असून, विजेत्या संघास 1,01,111 रु., उपविजेत्या संघास 50,555 रु. व दोन्ही संघांना भव्य …

Read More »

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘आरटीआयएससी’ क्लब अजिंक्य

पनवेल : रामप्रहर वृत्तपालघर केळवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अ‍ॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित 42व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)च्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धा शिबिरात मुंबई, नवी मुंबई, …

Read More »

अटल करंडकाची ‘ब्रम्हास्त्र’ मानकरी, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ब्रम्हास्त्र या एकांकिकेने बाजी मारली. या स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. …

Read More »

खातेवाटप झाले, आता काम करा!

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कुरबुरी सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येतो. काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे, तर शिवसेनेसाठी हा घाट्याचा सौदा ठरला. खातेवाटप झाल्यानंतर आता सुव्यवस्थित कारभार करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या …

Read More »

भाजप उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ बाइक रॅलीला तुफान प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील भाजप, रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 5) भव्य विजय संकल्प बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाअंतिम सोहळ्यास भेट दिली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे सोबत होते. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे यांनी स्पर्धेत सहभागी एकूण 65 एकांकिकांमधून अंतिम फेरीसाठी 20 एकांकिका पात्र ठरल्या आणि त्यातून चार एकांकिका बक्षीसपात्र ठरल्या, परंतु कुणावर अन्याय होऊ …

Read More »

मंत्रिमंडळ खातेवाटपावर राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण, शिवसेनेच्या वाट्यालाही आली यथातथा खाती

मुंबई : प्रतिनिधी गेले अनेक दिवस सुरू असलेल्या घोळामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यास मान्यता दिली आहे. या खातेवाटपात महत्त्वाची खाती आपल्याकडे वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे, तर काँग्रेस पक्षाची मात्र दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. तिसरीकडे शिवसेनेच्या …

Read More »