मॉस्को : वृत्तसंस्थाभारताच्या कोनेरू हम्पीने रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटात भारताच्या हम्पीने, तर पुरुष गटात नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने विजेतपद मिळवले.या स्पर्धेतील प्रत्येक फेरीत हम्पीने नऊ गुण मिळवल्याने ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. दोघींचे गुण …
Read More »‘यंग इंडिया’ सुसाऽऽट!
भारतीय युवा संघाचा आफ्रिकेवर सलग दुसरा विजय लंडन : वृत्तसंस्थावयाची 18 वर्षे पूर्ण करणारा मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैस्वालने (नाबाद 89 धावा आणि 4 बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर 19 वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आठ गडी आणि 202 चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह भारताने …
Read More »बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी
पाली ः प्रतिनिधी अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुटीनिमित्त मोठी गर्दी होत आहे. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील. कारण नाताळच्या सुट्या, नवीन …
Read More »पोलीस ठाण्याची पडीक इमारत ठरतेय अवैध धंद्यांचे ठिकाण
खालापूर : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत व बोरघाटातील वाहतुकीचा ताण तसेच शहराची झपाट्याने होणारी वाढ या कारणाने खोपोलीत 1972 मध्ये नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ग्रामीण विकास यंत्रणा विक्री केंद्राच्या इमारतीमध्ये भाडेपट्ट्यावर खोपोली पोलीस ठाण्याचे कार्य चालू होते, मात्र 10 वर्षांपूर्वी खोपोली पोलीस ठाणे …
Read More »श्रीसदस्यांतर्फे श्रमदानातून वनराई बंधारा
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांच्या वतीने 2019 वर्षातील अखेरच्या रविवारी (दि. 29) श्रमदान करून सावित्री नदीच्या उपनदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पोलादपूर परिसरातील श्री सदस्यांच्या वतीने रविवारी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील उपनदीवर सामूहिक श्रमदानातून वनराई बंधार्याची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ …
Read More »भारताला ’अच्छे दिन’ येताहेत!
नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी ’अच्छे दिन’ ’सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बांग द्यायला सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 …
Read More »2019 सरताना अन् 2020मध्ये पाऊल टाकताना…
बघता बघता वर्ष सरायला आले. 2019 कधी संपत आले हे कळलेदेखील नाही. दिवस कसे भुरर्कन उडून गेले. मंगळवारी रात्री ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केल्यानंतर आपण सर्व जण नव्या वर्षात पर्दापण करणार आहोत. तसे पाहिले तर येणारा प्रत्येक क्षण हा जाण्यासाठीच असतो. आताचा वर्तमान उद्या भूतकाळ होऊन जातो, पण म्हणून काही कुणी …
Read More »रायगड किल्ला रोप वे कंपनीला जिल्हाधिकार्यांची नोटीस
अलिबाग : प्रतिनिधीरायगड किल्ल्यावरील रोप वेच्या संचालक कंपनीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोटीस बजावली आहे. पुरातत्व विभाग आणि संबधित यंत्रणांच्या परवानगीशिवाय रोप वे प्रकल्पाच्या क्षमतावृद्धीचे काम सुरू केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड किल्ला प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने …
Read More »गाढी नदी संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त’गाढी नदी वाचवू या’ या उपक्रमातून गाढी नदीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वांनी या संवर्धन मोहिमेत सहभाग घेणे गरजेचे असून, गाढी नदी संरक्षण व विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) खांदा कॉलनी …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘रमाधाम’ला भेट
शिवसेना नगरसेविका, कार्यकर्त्यांसह प्रसारमाध्यमांना पोलिसांनी रोखले खोपोली : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 28) खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमास भेट दिली. हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगत या वेळी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ‘रमाधाम’च्या प्रवेशद्वारावर रोखल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनाही मज्जाव केला. रमाधाम वृद्धाश्रमातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper