Breaking News

महत्वाच्या बातम्या

तासगाव नदीवर श्रमदानातून बंधारा

माणगाव गटविकास अधिकार्‍यांच्या हस्ते जलपूजन माणगाव : प्रतिनिधी पंचायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला असून, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. माणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन गटविकास अधिकार्‍यांनी केले आहे. तालुक्यातील भागाड …

Read More »

कबड्डी संघांची भाईगिरी ठेचा!

रायगड जिल्हा म्हणजे कबड्डीचे माहेरघर समजले जाते. येथे कबड्डीच्या जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धा अन्य जिल्ह्यात होत नाहीत, परंतु याच जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेत जेवढ्या भानगडी होतात तेवढ्या भानगडी इतर कोणत्याही जिल्ह्यात होत नाहीत. रायगड जिल्ह्यातील कबड्डीला भानगडींचा शाप आहे. याला जबाबदार जेवढे खेळाडू आहेत तेव्हढीच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनदेखील याला …

Read More »

उचलली जीभ…!

नुकत्याच घडलेल्या हैदराबाद येथील एका डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांनी करायला नको होते. बलात्काराच्या घटनांमुळे देशातील जनता आधीच हळवी झाली आहे. सोशल मीडियापासून अन्य अनेक माध्यमांपर्यंत सर्वच स्तरांवर बलात्काराच्या घटनांबद्दल असंतोष व्यक्त होत असताना सुज्ञ पुढार्‍यांनी सांत्वनाचा सूर लावणे अपेक्षित असते, परंतु या सुज्ञपणाची अपेक्षा कुठल्याही …

Read More »

थाय बॉक्सिंगमध्येे पनवेलच्या खेळाडूंचे यश

पनवेल : वार्ताहर शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 14व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट ज्युनियर आणि सीनिअर थाय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पनवेल शहर थाय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या कामोठे व खांदा कॉलनी शाखेच्या खेळाडूंनी सहभाग घेत प्राविण्य मिळवले. विजेत्या खेळाडूंची मध्य प्रदेश येथे होणार्‍या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

332 खेळाडूंवर लागणार बोली

स्टेन, मॅक्सवेल, उथप्पा, मॅथ्यूजचा समावेश मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या …

Read More »

जागतिक मानांकनात स्वस्तिका घोषचा ‘षटकार’

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची टेबल टेनिसपटू सहाव्या क्रमांकावर पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने पुन्हा एकदा सुवर्णयश कामगिरी करीत ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे हा बहुमान मिळविणारी भारतातील ती पहिली टेबल टेनिसपटू …

Read More »

प्रकाश रायकर म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी

म्हसळा : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी प्रकाश गोपाळ रायकर यांची जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे. ग्रामीण भागातील उपक्रमशील युवक म्हणून रायकर यांची ओळख आहे. या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मनोज भागवत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी महेश पाटील, तुकाराम पाटील, …

Read More »

पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

परळी : प्रतिनिधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि. 12) गोपीनाथ गडावर खास मेळावा आयोजित केला होता. या वेळी बोलताना त्यांनी मी पक्ष सोडणार नाही, याचा पुनरूच्चार करून चर्चांना पूर्णविराम दिला. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री …

Read More »

काँग्रेसचे हमाल दे धमाल!

भाजप नेते आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी रोज नवे यू टर्न…सत्तेसाठी पाहा कशी कमाल…काँग्रेसचे हमाल दे धमाल! असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देशातील तमाम हिंदूंसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी …

Read More »

काँग्रेस ईशान्य भारतात आग लावतेय

धनबाद (झारखंड) : वृत्तसंस्था काँग्रेस पक्षाने नेहमीच शरणार्थींचा वापर केला आहे आणि आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ते ईशान्य भागात आग लावत आहेत, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणूक सभेत बोलताना केला. काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवत असून, मी ईशान्येकडील लोकांना खात्री देतो की त्यांनी कोणाकडूनही फसण्याची गरज नाही. …

Read More »