अलिबाग : प्रतिनिधी प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बांधलेल्या हॉलिडे रिसॉर्टचे वाढीव बांधकाम शुक्रवार (दि 8)पासून पाडण्यात येणार आहे. अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. बॉम्बे इन्व्हरमेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या …
Read More »पाताळगंगा वसाहतीत कंटेनरची दोन दुचाकींसह वृक्षाला धडक
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत बुधवारी (दि. 6) रात्री बेफाम कंटेनर चालकामुळे अपघाताची घटना घडली. या कंटेनरच्या धडकेत भला मोठा वृक्ष कोसळला असून बाजूपट्टीवर उभ्या दोन दुचाकींचा चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (एमएच-43,वाय-9193) हा सावरोली- खारपाडा मार्गाने …
Read More »माथेरानमध्ये भामट्यांना दणका, दस्तुरी नाक्यावर पोलिसांची धडक कारवाई
कर्जत : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक तसेच दिशाभूल होते अशा तक्रारी होत्या. त्या अनुशंघाने येथील पोलिसांनी दोन दिवस मोहीम राबवून दस्तुरी येथील घोडेवाले, हात रीक्षावाले, एजंट व कुली यांच्यावर कारवाई केली. सध्या माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, मिनिट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, …
Read More »‘बालकामगार अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करू या’
अलिबाग : जिमाका बालकामगार प्रथेविरुद्ध संपूर्ण राज्यात जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्याबाबत कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकार यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास कामगार उपायुक्त प्र. न. पवार, सहाय्यक कामगार आयुक्त भ. मा. आंधळे, सहाय्यक कामगार …
Read More »‘मिशन शिवडी-न्हावा शेवा लिंक’
पाच हजार कामगारांची प्रकल्पासाठी नियुक्ती मुंबई : प्रतिनिधी शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने वेगाने हालचाली सुरू केल्या असून, या प्रकल्पावर पाच हजार तंत्रज्ञ व कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सप्टेंबर 2022पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. मुंबईच्या दक्षिण भागातील शिवडीपासून न्हावा …
Read More »कायदा आणि सुव्यस्थेचे पालन करावे -प्रांताधिकारी इनामदार
महाड : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या जागेसंबधीच्या खटल्याचा निकाल येत्या कांही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. या निकालाचा सन्मान करुन त्याचे पालन करावे, असे प्रतिपादन महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले. महाड प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार उपस्थितांना …
Read More »कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांचे आवाहन
नागोठणे : प्रतिनिधी काही दिवसांत अयोध्येतील राममंदिर, बाबरी मशिदीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होणार आहे. नागोठण्यासह संपूर्ण विभाग शांतताप्रिय आहे, अशी आमच्या पोलीस दप्तरी नोंद असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन रोह्याचे डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नागोठण्यात केले. अयोध्येतील लवकरच जाहीर होणार्या निकालासंदर्भात …
Read More »प्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा रुळावर
कर्जत : बातमीदार बोरघाटात पावसाळ्यात भूस्खलन व दरडी कोसळून मुंबई-पुणे रेल्वेमार्ग नादुरुस्त झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी गेल्या चार महिन्यात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी मुंबई-पुणे या मधील दुवा असलेली आणि पनवेलमार्गे धावणारी प्रगती एक्सप्रेस ही गाडी येत्या …
Read More »माणगाव-पुणे महामार्गाच्या कामाला गती
माणगांव : प्रतिनिधी पुणे – दिघी महामार्गाच्या दिघी ते माणगांव या टप्प्याच्या रूंदिकरणाचे काम 70 टक्के पुर्ण झाले असून, माणगांव ते पूणे या टप्प्यातील रस्ता रूंदीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महामार्गावरील माणगांव – दिघी पोर्ट दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाचे काम दोन …
Read More »सुधागडातील गावे नॉट रिचेबल, बहुसंख्य कंपन्यांचे नेटवर्कच गायब, नागरिक संतप्त आवश्यकतेनुसार मोबाईल टॉवर बसवण्याची मागणी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात 109 गावे आहेत. हा तालुका अदिवासीबहुल आहे. बहुसंख्य गावे डोंगर व दर्याखोर्यात वसली आहेत. यातील सुमारे 40 टक्के गावांना अजूनही मोबाईल व इंटरनेट सेवा मिळालेली नाही. तर काही गावांमध्ये फक्त ठरावीक कंपन्यांचेच मोबाईल व इंटरनेट सेवा चालते, ती ही व्यत्यय देत. कानाकोपर्यात आपले नेटवर्क असल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper