Breaking News

महत्वाच्या बातम्या

नगरसेवक राजू सोनी यांची समाजसेवा स्वखर्चाने बसविले पेव्हर ब्लॉक

पनवेल ः वार्ताहर – श्री नवनाथ मंदिर मिडलक्लास सोसायटीे येथे सतत पडणार्‍या पावसामुळे पावसाचे पाणी साठून मंदिरात जाण्याच्या वाटेवर पाणी साचून राहायचे व येथे नेहमी चिखल जमा व्हायचा. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना त्रास सहन करावा लागत असे. हे नगरसेवक राजू सोनी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्या ठिकाणी स्वखर्चाने पेवर …

Read More »

दुर्गवीर प्रतिष्ठानची सुरगड श्रमदान मोहीम फत्ते

भर पावसात किल्ल्यावर राबविले स्वच्छता अभियान पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील विविध किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले संवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच घेरा सुरगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी भर पावसात प्रतिष्ठानच्या 20 सदस्यांनी किल्ल्याची व परिसराची साफसफाई व स्वच्छता …

Read More »

रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ ; उरण विधानसभा महिला मोर्चाचा पुढाकार

उरण ः वार्ताहर  – उरण विधानसभा महिला मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ झाला. उरण विधानसभा महिला मोर्चाच्या संयोजिका तथा उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी सायली म्हात्रे यांनी रक्षाबंधन पर्वाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम उरण नगर परिषद सभा हॉल …

Read More »

म्हैस शेतात घुसली म्हणून केला हल्ला

रेवदंडा : प्रतिनिधी म्हैस शेतात घुसल्याचा राग मनात धरून सागवाडी येथे दोघांवर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील सागवाडी येथील जयश्री फसाळ या दुसर्‍याच्या ठिकाणी काम करीत असताना महाजने येथील समीर पाटील यांनी तेथे …

Read More »

कर्जतचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहून मणिपूर राज्यातील अधिकारी खूश

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार नगरपालिकेच्या माध्यमातून कर्जतमध्ये उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा शून्य कचरा डेपो बनला आहे.  या कचरा डेपो परिसराची पाहणी केल्यानंतर मणिपूर राज्यातून आलेल्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत नगर परिषदेचा शून्य कचरा डेपो पाहण्यासाठी मणिपूर राज्यातील अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ आले होते. कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि नगर …

Read More »

तुंगी गावातील घर कोसळून नुकसान

कर्जत : बातमीदार संततधात पावसामुळे कर्जत तालुक्यातील तुंगी गावामधील चंद्रकांत सुपे यांचे कौलारू घर गुरुवारी कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने सुपे कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सततचा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे कोसळून प्रचंड नुकसान झाले आहे. गुरुवारी …

Read More »

अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्त्वपूर्ण

कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन कर्जत : रामप्रहर वृत्त जगात भात लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र भारतामध्ये (4.39 दशलक्ष हेक्टर) असून उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात भाताचा वाटा 40 टक्के पेक्षा अधिक असल्याने अन्न सुरक्षेमध्ये भाताचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे …

Read More »

स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रवीण पाटील यांचा अर्ज

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि. 1) नगरसचिव तिलकराज खापर्डे यांच्याकडे सादर केला. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शनिवारी (दि. 3) निवडणूक होणार आहे. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘अ’चे …

Read More »

आरोग्य महाशिबिराची आज नियोजन बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भाजप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा बैठक शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना; पनवेलमध्ये 1069 लाभार्थी

पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना लागू असून, पनवेल महापालिका क्षेत्रात आठ हॉस्पिटलची यामध्ये निवड करण्यात आली आहे. 1069 लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत याचा लाभ मिळणार आहे. ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार …

Read More »