Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांची टोपी बदलली; 70 वर्षे जुन्या टोपीला राम राम

वाशिम : प्रतिनिधी राज्यातील पोलिसांच्या वर्दीची ओळख तशी सगळ्यांनाच आहे. खाकी वर्दी आणि डोक्यावर टोपी भल्याभल्यांना घाम फोडते, मात्र कर्तव्यावर काम करताना पोलीस कर्मचार्‍यांना जुनी टोपी सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागायची. त्यामुळे टोपी सांभाळायची की कर्तव्य पार पाडायचं, असा प्रश्न पडत होता, पण आता पोलिसांच्या डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीने …

Read More »

आजपासून मुंबई-पुणे मार्गावर जादा एसटी

मुंबई : प्रतिनिधी मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरच्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. त्यानुसार …

Read More »

जेएनपीटीकडून अधिकृत वेबसाईटची नवीन आवृत्ती लॉन्च

उरण ः रामप्रहर वृत्त देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये अधिक सुलभरीत्या हाताळणी करता यावी यासाठी वाचनीय दर्शनी भाग, दैनंदिन तक्ते व माहिती, सुयोग्य व अचूक माहितीसह विविध कक्ष आणि सर्व पानांची सुलभ माहिती यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आली आहे. या नवीन वेबसाईटमुळे (ुुु.क्षपिेीीं.र्सेीं.ळप) वापरकर्त्यांना बंदराविषयी कुठलीही माहिती …

Read More »

अलोरिया अमृततुल्य चहाच्या दुकानाचे उद्घाटन

कामोठे ः येथे अलोरिया अमृततुल्य चहाचे दुकान नव्याने सुरू झाले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाचे मालक नीलेश शिंदे आणि सुशांत गोसावी यांचे अभिनंदन करून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार …

Read More »

निलिमा पवार आणि सुुरेखा कोळी यांची सदिच्छा भेट

पनवेल ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा निलिमा पवार आणि महिला शहर अध्यक्षा सुुरेखा कोळी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली.

Read More »

खांदा वसाहतीत झाड उन्मळून पडले

पनवेल ः वार्ताहर बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी 5 वाजता खांदा वसाहतीतील सेक्टर 8 येथील ए टाइप बिल्डिंगलगत असलेले झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला केले. सेक्टर 8 येथे सिडकोने बांधलेली ए टाइपची घरे आहेत. इमारतींच्या संरक्षण भिंतीच्या आतमध्ये …

Read More »

पांडवकड्यावर पर्यटकांवर कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील पांडवकड्यावर बंदीचे आदेश असूनदेखील बंदी झुगारणार्‍या पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचालून 12 पर्यटकांना अटक करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. या पूर्वी 29 पर्यटकांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली होती. विशेष म्हणजे कारवाई करण्यापूर्वी या 12 पर्यटकांपैकी काही पर्यटक वाहून जात असताना खारघर पोलिसांनी …

Read More »

रिक्षा थांब्यांना पयार्र्यी जागा उपलब्ध करून द्यावी

भाजप युवा मोर्चाची महानगरपालिकेकडे मागणी; वाहतूक पोलिसांना सहाय्यक देण्याचीही सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी रिक्षा थांब्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 25) महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आली, तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना पालिकेने सहाय्यक कर्मचारी पुरवावेत, …

Read More »

आंब्रे कुटुंबीयांना शासकीय मदतीचा धनादेश

पनवेल : प्रतिनिधी उमरोली येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आदित्य आणि सारिका आंब्रे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 25) पनवेल तहसील कार्यालयात हा चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पनवेल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9 जुलै रोजी …

Read More »

टेंभरे प्राथमिक शाळेत गणवेश वितरण

कर्जत : प्रतिनिधी नवी मुंबईतील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने कर्जत तालुक्यातील टेंभरे येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्‍या आदिवासी आणि गरजू मुलांना क्रीडा गणवेश व स्पोर्ट शूजचे वितरण करण्यात आले. आपली संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विनय म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक कोळी यांनी …

Read More »