पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चोळई नदीमध्ये उतरलेला एक कामगार पाण्याचा प्रवाह वाढल्याने घाबरून मध्यभागी झालेल्या बेटासारख्या भागामध्ये उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला अन्य कामगार नदीपात्रात कोलांट्या खाऊ लागल्याने घाबरून अत्यवस्थ झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत कशेडी घाटाच्या प्रारंभी चोळई गावाच्या मागच्या बाजूने वाहणार्या चोळई नदीपात्रामध्ये सोमवारी (दि. 8) दुपारी …
Read More »गोराई-बोरिवली, मालाड-मार्वे रोपवे प्रकल्प
शक्यता तपासणीसाठी कंपनीची नियुक्ती मुंबई : प्रतिनिधी – मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची स्थानकांवर मल्टी मॉडल इंटिग्रेशन प्रकल्प राबविणे, तसेच गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोपवे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस मंजुरी देण्यात …
Read More »खवल्या मांजराची तस्करी करणारे दोघे महाडमध्ये जेरबंद
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरात सांदोशी गावातील आदिवासीवाडीवर खवल्या मांजराची तस्करी करणार्या दोन जणांना महाड पोलिसांनी पकडले असून, अधिक तपासाकरिता त्यांना महाड वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या जंगल भागात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री सांदोशी गावात …
Read More »आरोग्याविषयी जागरूकता आवश्यक ; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन धन्वंतरी संस्थेकडून डॉक्टरांचा सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त हल्ली धकाधकीच्या जीवनात माणसाला विविध रोग, आजार होत असतात. त्यामुळे त्रस्त व्हायला होते. कॅन्सरसारख्या व्याधींमुळे तर जगणे अवघड होऊन बसते, पण अशा असाध्य रोगांवरही निश्चितपणे मात करता येते. यासाठी आरोग्यविषयक जागरूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. …
Read More »भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा उरणमध्ये शुभारंभ
उरण : वार्ताहर उरण भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त तथा रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 7) करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी, कार्यकर्त्यांनी नवीन सदस्य नोंदणीसाठी जास्तीत जास्त भर द्यावा, असे सूचित केले. उरण शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात झालेल्या या शुभारंभ कार्यक्रमास नगराध्यक्षा …
Read More »भाजपची ताकद अधिक वाढवा : अॅड. माधवी नाईक
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र व राज्य सरकारने महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध योजना आणल्या. त्यामुळे सरकारप्रति महिलांचे समर्थन वाढल्याचे लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. हे समर्थन भाजपकडे आणून पक्षाची ताकद अधिक वाढवा, असे आवाहन महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक यांनी केले. त्या जिल्हा बैठकीत बोलत होत्या. भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चाची …
Read More »जोरदार पावसाने नाशिकमध्ये पूर
नाशिक ः प्रतिनिधी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर येऊन अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. नाशकात तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून, मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी …
Read More »काँग्रेस पक्षामध्ये राजीनामासत्र सुरूच ; मुंबई अध्यक्षपदावरून मिलिंद देवरा पायउतार
मुंबई : प्रतिनिधी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे, तसेच राजीनामा देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ …
Read More »सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामींची भागम्भाग
बंगळुरू : काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच. डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून भारतात परतले आहेत, तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत …
Read More »अलिबागमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
उपमहापौर विक्रांत पाटील यांची उपस्थिती अलिबाग ः प्रतिनिधी भाजप युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस व पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अलिबाग येथे करण्यात आला. सध्या सर्वत्र भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान सर्वत्र सुरू आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातसुद्धा हे अभियान सुरू असून संघटन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper