Breaking News

महत्वाच्या बातम्या

माझ्या कामगिरीची दखल घ्या : रहाणे

मुंबई : प्रतिनिधी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळतो आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंची विश्वचषकाच्या संघात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचा कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची विश्वचषक संघात वर्णी लागण्याची शक्यता …

Read More »

हॉकीचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग म्हणाले, खेळातही पाकला हरवून दाखवा

कोलकाता : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानसोबत संबंध ठेवणे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे यावर विवाद सुरू आहेत. अनेक भारतीयांचे पाकिस्तानशी संबंध ठेऊ नये असे म्हणणे आहे. आपल्या देशाशी असलेले पाकिस्तानचे क्रीडा संबंधही तोडावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. हॉकी टीमचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग यांनी भारताला …

Read More »

पत्रकार चषकात कोप्रोली संघाची बाजी

पनवेल : बातमीदार पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरेपाडा येथील मैदानावर पत्रकार चषक 2019चे आयोजन करण्यात आले होते. या चषकावर कोप्रोली संघाने आपले नाव कोरले, तर पाली संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 27 फेब्रुवारी रोजी पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट …

Read More »

रोह्यातील पारंगखार येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा

रोहे ः प्रतिनिधी राज्य आंबा उत्पादक संघ व तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने रोहा तालुक्यातील पारंगखार येथील श्री राम मंदिरात रविवारी (दि. 3) दुपारी 2 वाजता जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके व उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या हस्ते …

Read More »

भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत आयसीसीने दिली हमी

दुबई : वृत्तसंस्था आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सुरक्षेविषयी बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली. त्यावर सुरक्षा वाढविण्याची गरज पडली, तर यावर संबंधित संस्थांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी हमी ‘आयसीसी’ने दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीचे प्रमुख राहुल जोहरी यांनी आयसीसीच्या बैठकीमध्ये सुरक्षेची बाब उपस्थित केली होती. भारतीय …

Read More »

रायगडात मराठी भाषा दिनाचा जागर

…तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही -प्रा. भालेकर अलिबाग : जोपर्यंत मराठी माणूस आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करीत राहील, तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक भरतकुमार भालेकर यांनी बुधवारी (दि. 27) येथे केले. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे -डॉ. अविनाश पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश पाटील यांनी केले आहे. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 27) मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

गेलचा नवा विक्रम

500 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज सेंट जॉर्ज : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरूच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली, मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही आणि त्यांना हा सामना गमवावा लागला, पण गेलने …

Read More »

पी. जे. पाटील म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रशंसोद्गार, अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

उरण : वार्ताहर पी. जे. पाटील म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रशंसोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. जसखार गावचे  सुपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते व शिक्षणप्रेमी पी. जे. पाटील यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि. 26) श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान जसखार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी …

Read More »

अनावश्यक ग्रुपमधून होणार सुटका

व्हॉटसअ‍ॅपच्या युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल, तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने त्याबाबातची पडताळणी सुरू केली आहे. सध्या 2.19.55 व्हर्जनवर हे नवे अपडेट आले आहे. या नव्या अपडेटद्वारे एखाद्याला …

Read More »