Breaking News

महत्वाच्या बातम्या

पाकिस्तान मुर्दाबादच्या नार्याने म्हसळा शहर दुमदुमले

म्हसळा : प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकीस्तानव्याप्त बालकोट भागात केलेल्या कारवाईबाबत म्हसळ्यातील नागरिकांनी  आनंद व्यक्त केला. शहरांतील सोशल मिडिया मार्फत आनंद व्यक्त होत असतानाच असल कादरी, सुवेल हवलदार, नईम दळवी, खालीद काजी, सुबान हळदे, अकमल कादरी या युवकांनी नेतृत्व करीत म्हसळा शहरातून भारतीय हवाई दलाचा जयजयकार केला. यावेळी …

Read More »

वेलकम अभिनंदन!

आज होणार सुटका; भारताच्या इशार्‍याने पाक वरमले इस्लामाबाद, नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी (दि. 1) सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेत केली. अभिनंदन यांना सुखरूप सोडा अन्यथा ठोस कारवाई करण्याचा इशारा भारताने दिला होता. त्याची गंभीर …

Read More »

मराठी शिक्षण कायदा करावा‘कोमसाप’ची निवेदनाद्वारे मागणी

पनवेल ः वार्ताहर मराठी शिक्षण कायदा व मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापित करावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ‘कोमसाप’चे उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे, समन्वयक अ. वि. जंगम, …

Read More »

हवाई दलाच्या कारवाईचे रायगडात स्वागत; अलिबागेत रॅली काढून जल्लोष…

अलिबाग : प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय वायुसेनेने बदला घेतला. पाक व्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे अलिबागमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधान सभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अलिबागेत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये समाजातील विविध स्तरातील …

Read More »

…तरच महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल -जाधव

सिडकोतर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ‘रयतेस पोटास लावणे’ हे होते. त्याच अनुषंगाने आजच्या राज्यकर्त्यांनीदेखील ‘रिकाम्या डोक्याला विचार व मोकळ्या हाताला काम’ या शिवरायांच्या तत्त्वास अनुसरून प्रशासन केल्यास महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल, असे मत जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज, …

Read More »

आकुर्लीत तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप आणि दंड

पनवेल : तालुक्यातील आकुर्ली येथील एका 17 वर्षीय तरुणाची हत्या करणार्‍या आरोपींना अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   आकुर्ली येथील आदित्य म्हसकर हा 23 जून 2013 रोजी घरातून आईसाठी औषध आणण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे तो हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा संघटन संवाद, कर्जतमध्ये असंख्य कार्यकर्ते जमले एकत्र

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारचा नारा दिला. मोदी यांचे लाईव्ह भाषण कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 28) शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालयात ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘संघटन संवाद‘ च्या माध्यमातून पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने …

Read More »

पारितोषिक वितरण समारंभात शिक्षक-विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल ः खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 18वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल -मुळे

पनवेल : एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी गुगल सर्च केले जाते, परंतु तुमच्या ज्ञानात कायमस्वरूपी भर टाकायची असेल तर गुगल सर्चवर अवलंबून न राहता पुस्तके वाचा. मराठी पुस्तके खरेदी करा. यामुळे भाषाही टिकेल आणि आपली संस्कृतीदेखील टिकेल, असे प्रतिपादन माहिती संचालनालयाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. कोकण मराठी साहित्य …

Read More »

भाजपात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच

उलवे नोडचे शेकाप कार्यकर्ते दाखल पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची घोडदौड सुरू असून गुरुवारी (दि. 28) उलवे नोड येथील शेकाप पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात …

Read More »