जेएनपीटी : प्रतिनिधी समुद्राच्या भरतीचे खारे पाणी उरण तालुक्यातील कुंडेगाव, नवघर, फुंडे, भेंडखळ गावांतील अनेक घरात शिरल्याची घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली. महसूल अधिकार्यांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या …
Read More »पाकिस्तानात जाणारे पाणी रोखणार ः ना. नितीन गडकरी
नवी दिल्ली : पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. पाकिस्तानात जाणारे भारतातील व्यास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे …
Read More »557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला निवडणूक
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते …
Read More »कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी
अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणार्या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करून तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी …
Read More »उमंग संस्थेला सोलर सिस्टीम भेट
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथे वर्ल्ड चिल्ड्रेन वेल्फेअर ट्रस्टची उमंग ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून गेल्या 10 वर्षांपासून मूकबधिर व अनाथांचा सांभाळ करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिकवण दिली जाते. संस्थेचे विश्वस्त कृष्णन रामानुजम यांच्या प्रयत्नाने व एल्कॅम साऊथ आशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने उमंग …
Read More »पेणमध्ये रक्तदान शिबिर
पेण : प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधून येथील सिद्धेश्वर मित्र मंडळाने पेणमधील महात्मा गांधी वाचनालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 77 तरुणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक समीर म्हात्रे, वाचनालयाचे अरविंद वनगे, शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पा सत्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते जयेश म्हात्रे यांनी …
Read More »नवमतदारांनी नाव नोंदणी करून घ्यावी
तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 23-24 फेब्रुवारी रोजी दोन दिवस विशेष नावनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या वेळी मतदार यादीत नाव …
Read More »सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे चित्ररथाद्वारे जिल्ह्यामध्ये प्रसारण
अलिबाग : जिमाका सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनांच्या संदेशाचे प्रसारण जिल्ह्यामध्ये चित्ररथाद्वारे करण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि. 20) जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना ह्या मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी …
Read More »दहशतवादी हल्ल्याचा निषेध सुरूच
नेरळमध्ये पाकिस्तानी झेंड्याचे दहन कर्जत : पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी नेरळकर शनिवारी रस्त्यावर उतरले. शहरातील शिवाजी महाराज चौकात सर्व जातीधर्माचे लोक आणि देशप्रेमी नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी गर्दी केली होती.शिवसेना शाखेमधून कॅण्डल मार्च काढून शिवसैनिक शिवाजी महाराज चौकात पोहचले. त्यानंतर तेथे अनेक …
Read More »वाकण हद्दीत पाणी साठवण टाक्यांचे लोकार्पण
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी आणि धामणीचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या पाणी साठवण टाक्यांचे लोकार्पण आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कुंभळवणे ते मुरेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, युवा सेना अधिकारी संजय कळंबे, उपसरपंच तानाजी जाधव, विभागप्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper