Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण

मान्यवरांची उपस्थिती पुणे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभाग आणि मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या वतीने ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी ऑनलाइन शरद रयत चषक आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. …

Read More »

ई-रिक्षाच्या समर्थनार्थ माथेरान नगर परिषदेवर मोर्चा

माथेरान : प्रतिनिधी माथेरानमध्ये लवकरात लवकर पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात यावी आणि शालेय विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ तसेच पर्यटकांसाठी स्वस्त व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था सुरू व्हावी यासाठी सोमवारी (दि. 3) येथील नागरिक एकवटले होते. सर्वपक्षीयांनी त्यास पाठिंबा देत आपला सहभाग नोंदविला. सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 3) राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत ‘सेवा अधिकार कायदा 2015’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानासाठी कोकण भवन येथील माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी …

Read More »

सीकेटी विद्यालयात सरस्वतीपूजन

महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंतीही साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात शनिवारी (दि. 1) सरस्वती पूजन करण्यात आले तसेच महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्याक संतोष चव्हाण यांनी सरस्वतीची पूजा करून महात्मा …

Read More »

अभ्यासात सातत्य ठेवून यशस्वी व्हा

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन गव्हाण विद्यालयात बारावी परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास प्रारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2023 या परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या परिक्षार्थींचे आवेदनपत्र भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे …

Read More »

विजयादशमीला भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे दहन करणार

किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये गरबाप्रेमींसह धरला ठेका पनवेल : रामप्रहर वृत्त विजयादशमीला रावण दहनासोबतच महाराष्ट्राला जो शाप आहे त्या भ्रष्टाचारी भस्मासुराचेदेखील दहन करणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पनवेलमध्ये आयोजित नवरात्रोत्सवात शनिवारी (दि. 2) बोलत होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री …

Read More »

कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडले

16 वर्षानंतरही शेतकर्‍यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच माणगाव ः प्रतिनिधी कुंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्राप्त खर्चापेक्षा जास्त झाल्यामुळे प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय व शासनाने नवीन बांधकाम सुरू करण्याचे आदेश वेळीच न दिल्याने प्रकलपाचे काम रखडले आहे. 16 वर्षानंतरही कोकणच्या आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याने या भागातील …

Read More »

भाजपतर्फे सुधागडात आदिवासींना धान्यवाटप

सुधागड ः रामप्रहर वृत्त महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 2) सुधागड तालुक्यातील आदिवासींना 50 धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईर्स कादरी यांच्यातर्फे हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन देखील करण्यात …

Read More »

पाइपलाइनच्या अपूर्ण कामामुळे महाड शहरात पाणीटंचाई

भाजपकडून टँकरने पाणीपुरवठा महाड ः प्रतिनिधी महाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोथुर्डे पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्याने महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.दरम्यान महिलांनी आक्रोश करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप महाडकरांसाठी धावून आले असून जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या माध्यमातून शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांनी भाजपचे …

Read More »

रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी माता

रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे …

Read More »