Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी गुरुवारी भाजपचा ‘रास्ता रोको’

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी व रस्त्याच्या सिमेंट  काँक्रिटीकरणाबाबत बुधवारी (दि.  21) सिडकोने कोणतेही लेखी आश्वासन   न दिल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्याकरिता भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता पूलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी …

Read More »

बदलीसाठी लाच घेणारा पोलीस निरीक्षक जाळ्यात

पनवेल, खालापूर : प्रतिनिधी पोलीस कर्मचार्‍यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना निरीक्षक रामचंद्र नारायण वारे (वय 58) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 20) रंगेहाथ अटक केली आहे. वारे हे महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागात कार्यरत होते. पोलीस निरीक्षक वारे यांनी पोलीस दलातील आपले सहकारी अधिकारी …

Read More »

कीर्तनकार समाजाला दिशा देतात : आमदार प्रशांत ठाकूर

कर्जतमध्ये प्रबोधनकारांचा कार्यगौरव सोहळा कर्जत : प्रतिनिधी कीर्तनकार मंडळी समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. भविष्यातही आपले मार्गदर्शन आम्हाला मिळेल यात शंका नाही. आपण सर्व मिळून चांगले काम करू.’ असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते कर्जत येथे मंगळवारी (दि. 20) आयोजित प्रबोधनकारांच्या कार्यगौरव सोहळ्यात बोलत होते. …

Read More »

विचुंबे-नवीन पनवेल नव्या पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्‍या नव्या पुलाच्या उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत …

Read More »

दिल्ली पोलिसांची न्हावा शेवा बंदरात मोठी कारवाई; 1725 कोटींचे ड्रग्ज जप्त

उरण : रामप्रहर वृत्त उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 1725 कोटींचे 22 टन हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या …

Read More »

आरपीएलसाठी खेळाडूंचे ऑक्शन

परेश ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त बहुचर्चित आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या दुसर्‍या हंगामासाठी खेळाडूंची ऑक्शन प्रक्रिया सोमवारी (दि. 19) झाली. या वेळी स्पर्धेच्या सन्मानचिन्हाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक संघाच्या कर्णधाराला टी-शर्ट देण्यात आले. …

Read More »

रक्तदान शिबिराला रोहेकरांचा प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती धाटाव : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका भाजपच्या वतीने भाटे वाचनालयात मंगळवारी (दि. 20) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रोहेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

रायगडातील रेशन दुकानांना मिळणार आयएसओ मानांकन

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना आयएसओ मानांकन देण्याची योजना जिल्हा पुरवठा विभागाकडून राबविण्यात येणार आहे. रेशनधारकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. रेशन दुकानांची तपासणी करून दुकानचालकांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील प्रत्येकी 10 दुकानांचा या योजनेत समावेश आहे. यामुळे …

Read More »

’शिवतीर्थ’वर घुमणार पंतप्रधान मोदींचा आवाज

ना. मुनगंटीवारांकडून राज ठाकरेंना खास गिफ्ट चंद्रपूर : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यानंतर त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज ऐकायला येणार आहे, कारण चंद्रपूर येथे आलेल्या आलेल्या राज यांना भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास गिफ्ट …

Read More »

भाजप महिला मोर्चाकडून दुर्लक्षित अंगणवाड्या दत्तक घेऊन सेवाकार्य

जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील यांची माहिती खोपोली : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवड्यांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर रायगड जिल्ह्याच्या नऊ मंडलातील अंगणवाड्या दोन महिन्यांसाठी दत्तक घेतल्याची माहिती महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी स्थानिक प्रतिनिधीशी बोलताना …

Read More »