Breaking News

महत्वाच्या बातम्या

सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. शिक्षण कधीही वाया जात नाही आणि आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सीए डॉ. प्रदीप कामथेकर यांनी बुधवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त नागरिक, शेतकर्‍यांना मदत करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, तर शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या वेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकर्‍यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्यात कोसळधार !

जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 13)देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी पाणी …

Read More »

जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुका चॅम्पियन

पेण : प्रतिनिधी पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पेणमधील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेत रवींद्र म्हात्रे, विनायक पाटील तसेच प्रथमेश मोकल यांच्याकडे किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी 45 सुवर्ण, 43 रौप्य आणि 18 कांस्यपदके …

Read More »

गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे सरसावली

रोहा-चिपळूणदरम्यान 32 मेमू धावणार रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांच्या सोयीकरता मध्य रेल्वे सरसावली असून या काळात रोहा ते चिपळूण या दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी दिली. त्यामुळे गणेशभक्तांच्या कोकणातील प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील …

Read More »

नागोठणे रिलायन्सच्या सात खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेसाठी निवड

पाली : प्रतिनिधी भुवनेश्वर येथे होणार्‍या राष्ट्रीय जलतरण वॉटर पोलो स्पर्धेकरीता रायगड जिल्ह्यातील सात खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. हे खेळाडू रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे येथील हेल्थ क्लब जलतरण तलावाचे  जलतरणपटू आहेत. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 49वी राष्ट्रीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा 16 ते 20 जुलैदरम्यान ओडिशातील …

Read More »

कशेडी घाटात अपघात; चोळई गावाजवळ ट्रक उलटला

पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील चोळई गावाजवळील वळणावर बुधवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. या अपघातात कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले. चालक सुनील सोपान वाघमारे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-43,जे-9855) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून कल्याणकडे येत होता. कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुध्द दिशेस …

Read More »

खालापुरातील शाळांना दोन दिवस सुटी

खालापूर : प्रतिनिधी मागील चार दिवस पावसाने घुमशान घातले असून बुधवारी (दि. 13) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खालापूर, खोपोली, रसायनी, मोहपाडा, चौक, वावोशी परिसरातील नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खोपोली-पाली मार्गावरील पुलावरून पाणी गेले तर काही ठिकाणी मार्गाच पाण्याखाली …

Read More »

खोपोलीत अफवांचा पूर; सुरक्षा यंत्रणांची धावपळ

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना अफवांचादेखील पूर आला असून त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांची बुधवारी (दि. 13) चांगलीच धावपळ झाली. खोपोली शहराच्या रहाटवाडा या परिसरात असणार्‍या पुलावरून दोन मुले वाहून गेल्याची वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, सुनील पुरी, …

Read More »

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

 पाली पुलावर सलग दुसर्‍या दिवशी आले पाणी; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल पाली : प्रतिनिधी दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून मंगळवारी दुपारी 12 नंतर पाणी गेले होते. ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री …

Read More »