Breaking News

महत्वाच्या बातम्या

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहर कार्यकारी समितीची बैठक

पनवेल : वार्ताहर केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारी समितीची बैठक नुकतीच मंगळवारी (दि. 21) उपायुक्त कैलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी, राष्ट्रीय …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडको घेराव आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी ‘दिबा’साहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी …

Read More »

खुटारी येथे हरिनाम सोहळा उत्साहात

श्री चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील खुटारी येथे श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने श्री. संत वामनबाबा महाराज, श्री. संत सावळाराम बाबा महाराज, श्री. संत आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री. चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन व नाम चिंतन हरिनाम सोहळा भक्तिमय वातावरणात …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात योग व संगीत दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिन व विश्व संगीत दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात दोन्ही दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्ताने शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये गीते सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, तसेच जागतिक योग दिनानिमित्त समिता माता (वाय. एस.एम. नेरूळ संस्थेच्या …

Read More »

पनवेल मनपा आपत्ती व्यवस्थापन सज्ज

बैठकीत विविध विषयांवर चर्चा व नियोजन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती आल्यास लागणार्‍या अत्यावश्यक विविध वस्तू, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती काळात लागणारे अत्यावश्यक फोन नंबर अशा विविध विषयांचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंगळवारी (दि. 21) मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …

Read More »

नवी मुंबईकरांनी साजरा केला योग दिन

आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबई : बातमीदार मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम …

Read More »

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळतर्फे पनवेलमध्ये योग दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे, …

Read More »

वाजेकर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर को.ए.सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनाच सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमाला शाळा समितीने चेअरमन व्ही. सी. म्हात्रे, शाळा समिती सदस्य नंदकुमार वाजेकर, अंजली उर्‍हेकर, देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी कोकीळ उपस्थित होत्या. सृष्टी विनोद ठाकूर हिने 481/ 500 गुणांसह प्रथम क्रमांक, गायत्री विनोद मुकादमे …

Read More »

नवी मुंबईत विकासकामांसाठी खोदाई सुरूच

पावसात नागरिकांचा खड्ड्यांतून प्रवास नवी मुंबई : बातमीदार महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक मेटाकुटीला आले …

Read More »

माची प्रबळगड येथे योग दिन साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योगसाधना केली. या कार्यक्रमात पनवेलच्या आरोग्य सेवा समितीचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद गोडबोले यांनी योगसाधनेसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी आमदार प्रशांत …

Read More »