Breaking News

महत्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे यांना वाढता पाठिंबा

आणखी चार आमदार गुवाहाटीत दाखल गुवाहाटी : वृत्तसंस्था मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आणखी चार आमदार गुरुवारी (दि. 23) सकाळी गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. यामध्ये शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार …

Read More »

शुक्रवारी पुन्हा भूमिपुत्र एकवटणार! ‘दिबां’च्या नावासाठी सिडको घेराव आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचीही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) ‘दिबा’साहेबांच्या स्मृतिदिनी सिडकोविरोधात घेराव आंदोलन …

Read More »

ताटातूट झालेल्या माय-लेकरांची भेट; रेल्वे तपासनीसांची सतर्कता

पनवेल : वार्ताहर रेल्वे तपासनीसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच ताटातुट झालेल्या माय-लेकरांची भेट घडवून आणताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.    नागरकॉईल गांधीधाम ट्रेनने (ट्रेन नं.16336) दोन लहानगी मुले आणि त्यांची आई अलवा ते अहमदाबाद असा प्रवास करीत होते. ट्रेनने चिपळूण रेल्वे स्टेशन सोडले आणि गाडी पनवेलच्या दिशेने धावू लागली. या …

Read More »

नवीन पनवेल येथे योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त इन्स्टिट्यूट ऑफ योग व आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती, पनवेल यांच्या पिल्लई कॉलेज, नवीन पनवेल येथे चालणार्‍या योग वर्गामध्ये 21 जून हा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला कार्यक्रम प्रमुख सुधा मोकल यांनी आरोग्य सेवा समितीतर्फे उपस्थितांचे स्वागत केले. तर जगन्नाथ देशमुख यांनी …

Read More »

रेल्वे प्रवाशांना सेवा-सुविधा मिळणार

पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सेवा-सुविधा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटीची बैठक सेंट्रल रेल्वेच्या डीसीएम यांच्यासोबत बुधवारी (दि. 22) झाली. कमिटीच्या सदस्यांनी प्रवाशांना उद्भवणार्‍या अडचणी व समितीच्या सूचना असणारे निवेदन दिले. यातील मुद्दे विचारात घेऊन त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन डीसीएम यांनी दिले. …

Read More »

शिरवणेत दूषित पाणीपुरवठा; नागरिक संतप्त

भाजपच्या माधुरी सुतार यांचे आयुक्तांना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार शिरवणे गाव गावठाण भागात मागील दोन महिन्यांपासून दूषित, पाणीपुरवठा होत असल्याने माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत दूषित पाणी पुरवठ्याबरोबर कमी दाबाने येणार्‍या पाणीपुरवठाबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, अशी विनंती …

Read More »

धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण 32 धोकादायक इमारती पालिकेने घोषित केल्या आहेत. यापैकी काही इमारतींंध्ये आजही रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे या अशा धोकादायक इमारतीत राहणार्‍या नागरिकांचा जीव धोक्यात येत असतो. अनेक ठिकाणी या धोकादायक इमारतीत राहणार्‍या नागरिकांना …

Read More »

खारघर कोपरा रस्त्यावर नो एण्ट्री!

पुलाखालील कोंडी रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय पनवेल : वार्ताहर खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्रीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर सेक्टर 18 मध्ये जाते तसेच खारघर सेक्टर …

Read More »

पोलादपुरातील शेतीबाबत बळीराजापुढे यक्षप्रश्न

देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्‍याच अन्नघटकांचा पुरवठा या भागातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या विशेषत: सुधारित भात …

Read More »

गोंधळलेले मावळे

बुधवारी दिवसभर जे राजकीय नाट्य शिवसेनेत रंगले, त्याने साधासुधा शिवसैनिक पार गोंधळून गेला असेल. रस्त्यावर आंदोलने करणारा किंवा प्रचारसभा घेणारा राजकीय पक्ष वेगळा असतो आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्षाला कायद्याचे अधिष्ठान असते. तो मात्र एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे असे दिसते. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाइव्ह करून …

Read More »