Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरणमध्येही फणस खरेदीसाठी गर्दी

उरण : वार्ताहर वटपौर्णिमा मंगळवारी (दि. 14) असल्याने दरवर्षीप्रमाणे फणसाला मागणी वाढली आहे. उरण शहरात ठिक-ठिकाणी मोक्याच्या जागी फणस विकावयास आले असून फणस खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला  मिळत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर बाजारात फणसाची मोठ्या प्रमाणात आवक होते. काही ठिकाणी किलोनुसार, 40 रुपये किलो …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रेडिऑलीजिस्टच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणार्‍या महिलांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा सेंटर, 100 खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार …

Read More »

उरणमध्ये भाजपची भव्य बाईक रॅली

उरण : वार्ताहर मोदी सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवारी (दि. 12) दास्तान फाटा शिवस्मारक येथे करण्यात आले होते. दरम्यान, या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. उरणमध्ये रविवारी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीची सुरुवात शिवस्मारकाजवळून झाली. पुढे रॅली दिघोडे, …

Read More »

भाजप भटके विमुक्त आघाडीची बैठक

पनवेलमध्ये नवीन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून आमदार नरेंद्र पवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भटके विमुक्त आघाडीच्या (भविआ) संघटनात्मक नियुक्त्या झाल्या. पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि. 11) झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान …

Read More »

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने दुहेरीत जिंकले सुवर्णपदक

पंचकुला : वृत्तसंस्था खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि दिया चितळे या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी 14-12, 11-09, 11-6 असे तीन सेट जिंकून ही ‘सुवर्ण’ कामगिरी केली. पनवेल तालुक्यातील खारघर येथे राहणार्‍या स्वस्तिकाने लहानपणापासून …

Read More »

श्रीवर्धनमध्ये तब्बल 36 तास वीजपुरवठा खंडित

स्थानिकांसह पर्यटकही त्रस्त श्रीवर्धन : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे श्रीवर्धनसह हरिहरेश्वरमधील वीजपुरवठा तब्बल 36 तास खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले. श्रीवर्धन शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या वेळी पाभरे वीज उपकेंद्रातून श्रीवर्धनकडे येणार्‍या मुख्य विद्युत वाहिनीवर विजेचे झोत पडल्यामुळे संपूर्ण म्हसळा ते …

Read More »

खारघरमध्ये रक्तदान, आरोग्य शिबिराला प्रतिसाद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 12) खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यावा

राज्यसभा निवडणुकीनंतर ना. नारायण राणे आक्रमक सिंधुदुर्ग : प्रतिनिधी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली …

Read More »

तळोजा एमआयडीसीत पाणीटंचाई

उद्योगांना फटका; उद्योग राज्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याची टीआयएची अपेक्षा पनवेल : वार्ताहर नागरी वसाहती प्रमाणे तळोजा एमआयडीसीमध्येही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने आता कारखानदारांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसे खर्च होत आहे. त्याचबरोबर उद्योग आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. यासंदर्भात तळोजा इंडस्ट्रीज …

Read More »

नवी मुंबईत हॅपी स्ट्रीट उत्साहात

शिवराज्याभिषेक ठरला आकर्षक नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नेरूळ पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उत्साहात झाला. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, हॅपी स्ट्रीट  सारखे पहाटे तसेच नयनरम्य वातावरणात होणारे कायर्क्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »