म्हसळा वाचनालयात शिवपुतळ्याचे पूजन म्हसळा ः प्रतिनिधी शिवस्वराज्य दिना निमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात सोमवारी (दि. 6) 349वा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले तसेच स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील, वाचनालयाचे सचिव अशोक काते, संचालक …
Read More »जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा; जिल्हा परिषद येथे भगव्या ध्वजाची गुढी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. ग्रामपंचायत विभाग कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. या वेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीतगायन करण्यात आले. जिल्हा …
Read More »रायगड संघाचा नंदुरबार संघावर दणदणीत विजय
नैतिक सोळंकीचे सामन्यात 13 बळी; स्मित पाटीलच्या आक्रमक 111 धावा पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे सुरू असलेल्या, 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगड संघाने नंदुरबार संघावर एक डाव आणि 194 धावांनी दणदणीत विजय संपादन केला. नाणेफेक जिंकून नंदुरबार संघाने फलंदाजी स्वीकारली, परंतु त्यांचा संपूर्ण डाव 56 …
Read More »माथेरानमध्ये ई-वाहनांची चाचणी घेण्याचे पालिकेला आदेश
कर्जत : बातमीदार माथेरान सनियंत्रण समितीने परवानगी दिल्यानंतर सर्वोच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार कडून ई-रिक्षाची चाचणी घेईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने माथेरान पालिकेला पत्र पाठवून ई रिक्षाची चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ई-वाहनांची चाचणी घेण्यात येणार असल्याने माथेरानकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना …
Read More »हर घर दस्तक 2ची पनवेल महापालिका क्षेत्रात सुरुवात
चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर लसीकरणाचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी हर घर दस्तक 2मोहिमेची सुरुवात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही मोहीम 1 जून ते 31 जुलैदरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे. …
Read More »“सर्वांच्या सोबतीने अनेक कामे मार्गी”
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे गव्हाण येथे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांना सोबत घेऊन अनेक कामे मार्गी लागतात, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) गव्हाण येथे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचे कार्यालय गव्हाण येथे नव्याने बांधण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी …
Read More »‘रयत’च्या सागर पाटील विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांचा धनादेश
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या ढवळी येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश रयतचे चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी सोबत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवंगत एन. डी. पाटील यांचे नातू सागर पाटील यांच्या नावाने ही शाळा …
Read More »शिवछत्रपतींच्या जयघोषाने किल्ले रायगड दुमदुमला
राज्याभिषेक दिन सोहळा शिवभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात अलिबाग : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा सोमवारी (दि. 6) किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात झाला. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळयाला मंत्रोच्चारांच्या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक …
Read More »सीकेटी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रविवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची हाक देण्यात आली. हे वृक्षारोपण संस्थेचे सचिव …
Read More »लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
कामोठ्यात स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे आठवे पुण्यस्मरण रविवारी (दि. 5) कामोठे येथे झाले. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जय गोपीनाथ प्रतिष्ठान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper