सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सिडकोने पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »ज्वेलर्समधून वस्तू चोरणार्यांना अटक
पनवेल ः सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरी करण्यांवर खांदेश्वर आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी त्रिकुटाला अटक केली आहे. कामोठ्यातील राधिका ज्वेलर्समधून 38 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तर खांदा कॉलनी सेक्टर 10 येथील ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये अशीच चोरी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. …
Read More »नवीन पनवेल ए टाईपमधील 100 चाळींच्या नळांची पाइपलाइन बदला
नगरसेवक भुजबळ यांची महापालिकेकडे मागणी पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 13 मधील ए टाईपमधील 100 चाळींची नळाची पाइपलाइन महापालिकेतर्फे बदलून देण्याची मागणी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महापालिका हद्दीतीलनवीन पनवेल प्रभाग 17मधील सिडको वसाहतीत असलेल्या सेक्टर …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांसाठी आसन व्यवस्था
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुविधांचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजीक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून पनवेल रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लोखंडी सोफा, खुर्च्या देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी इनरव्हील क्लबच्या …
Read More »कानपोलीत विकासकामांचा शुभारंभ
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कानपोली येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून अंतर्गत नाल्यांची व 50 मीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे काम आठ लाख रुपयांची निधी वापरून करण्यात येत आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका …
Read More »तीन वाड्यांना पाणीसाठवण टाक्यांची भेट
महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्याकडून सुविधा महाड : प्रतिनिधी तालुक्यातील तीन आदिवासी वाड्यांना महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या मार्फत पाणी साठवण टाक्या भेट देण्यात आल्या. पाणी साठा करण्याची समस्या महाड पत्रकार संघ आणि बाबूलाल जैन यांच्या माध्यमातून दूर करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. महाड तालुक्यांतील दुर्गम …
Read More »नेरळ येथे माकडाला प्राणीमित्रांनी केले जेरबंद
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन परिसरातील निवासी संकुलात पिसाळलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. त्यापैकी एका माकडाला मंगळवारी (दि. 17) बदलापूर येथील प्राणीमित्रांनी सापळा लावून पकडले. त्याला खोपोली येथील जंगलात सोडण्यात आले. नेरळ येथील तुलसी निवासी संकुलात गेल्या काही महिन्यांपासून फासेपारध्यांनी सोडलेल्या दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. पिसाळलेली ती …
Read More »बागमळा खाडीत केला जातोय भराव
पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती अलिबाग : प्रतिनिधी निसर्गसौंदर्याने बहरलेल्या अलिबाग तालुक्यातील नागाव-चौल परिसरामधील बागमळा खाडीत मातीचा भराव करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती आहे. हे भरावाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अलिबाग तालुक्यातील खाड्या भराव करून बजवून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रेवस बंदराजवळील …
Read More »रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नवघर ग्रामस्थांचे पेण प्रांत कार्यालयासमोर उपोषण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील नवघर येथील रेशनधान्य दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 17) ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांसह पेण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या वेळी पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नवघर येथे महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या नावाने रेशनिंग …
Read More »नागोठण्यातील रस्ता त्वरित दुरुस्त करा
भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांची मागणी नागोठणे : प्रतिनिधी शहरातील विठोबाच्या विहिरीसमोरील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना योग्य ती काळजी न घेतल्याने तेथे तीव्र स्वरूपाचा उतार तयार झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे केली आहे. पेव्हर ब्लॉक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper