कर्जत : बातमीदार काळवीटसारखी दिसणारी जंगलातील निलगाय वांगणी गावातील एका शेतकर्याच्या घरात घुसली. या शेतकर्याने या निलगायीला बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आणि पोलिसांनी सर्व नोंदी घेतल्यानंतर निलगायील सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. जंगलात रस्ता चुकलेली व कुत्रे मागे लागल्याने घाबरलेली जखमी निलगाय कर्जत तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या वांगणी गावातील कमलाकर जांगरे …
Read More »राजनाला कालवा परिसरातील शेतकर्यांना भातशेतीत अडथळे; दुरुस्ती रखडली; शेतकरी हवालदिल
कर्जत : बातमीदार उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी भाताची शेती करण्यासाठी सोडले जाते. या वर्षी पावसाळ्यात कालव्यांना पडलेल्या खांडींची दुरुस्ती वेळेवर झाली नाही, त्यामुळे दुबार शेतीसाठी पाणी येणार नाही. 35 गावांतील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्या राजनाला कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते, मात्र पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने मशिनरी दिली …
Read More »कर्जतची खुशी पुन्हा झळकणार चित्रपटात
कर्जत : प्रतिनिधी कर्जतमधील चिमुरडी कलाकार खुशी हजारे ही ‘आपडी थापडी‘ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. खुशीने यापूर्वी बालकलाकार म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसोबत काम केलेले आहे. श्रेयस तळपदेने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बर्याच …
Read More »कुडाळच्या ‘बिलिमारो’ने जिंकला मानाचा अटल करंडक
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा कोण जिंकणार याची अवघ्या महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता अखेर …
Read More »ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : प्रतिनिधी ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सोमवारी (दि. 31) रस्त्यावर उतरले. धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही विद्यार्थ्यांनी …
Read More »12 आमदारांच्या विधानभवनातील प्रवेशसाठी शेलारांचे सचिवांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजप आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. …
Read More »‘सीकेटी’त लिंग समानता विषयावर व्याख्यान
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज पनवेल (स्वायत्त) च्या इंग्रजी विभागामार्फत ’लिंग समानता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी एस. एस. ए. कॉलेज, सोलापूरच्या प्रा. डॉ. अस्मा खान (इंग्रजी विभाग) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उलवे नोड 2 चे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवधेश महतो यांच्या सौजन्याने रविवारी (दि. 30) वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उलवे नोड सेक्टर 17 प्लॉट क्रमांक 46 मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी झाडे लावा झाडे जगवा …
Read More »म्हसळ्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
म्हसळा : प्रतिनिधी शासनस्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम गावाची, तालुक्याची संस्कृती विकसित करीत असते. येथील नागरिक निर्सगाच्या सान्निध्यात आहेत, त्यांनी तो निसर्ग वाचायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन म्हसळ्याचे तहसीलदार समीर घारे यांनी येथे केले. महसूल विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून म्हसळा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये नुकताच …
Read More »अडकलेल्या ट्रेकर्सची आठ तासांनंतर सुटका; यशवंती हायकर्स, निसर्ग मित्र मदतीला
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणिकगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पेणमधील तिघा जणांच्या नवीन वाट शोधण्याचे साहस चांगलेच अंगलट आले. तब्बल आठ तास दरीच्या मध्यावर अडकल्यानंतर मदतीला आलेल्या खोपोलीतील यशवंती हायकर्स, पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेच्या सदस्यांनी, तसेच स्थानिकांनी तिघा पर्यटकांची सुटका केली. रविवारी पेण येथून दहा तरुण वडगाव (ता. खालापूर) येथील माणिकगडावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper