स्वराज्याची राजधानी महाडमध्ये! स्वराज्य जननी जिजाऊंची समाधी महाडमध्ये! छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महाडमध्ये! डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या समता चळवळीचे चवदारतळे महाडमध्ये! दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ महाडमध्ये! सम्राट अशोक कालीन बौद्धलेणी महाडमध्ये! सी. डी. देशमुखांचे जन्मगाव महाडमध्ये! आणि आता पद्मश्री पुरस्कार महाडमध्ये!महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या भूमीत, अनेक विचारवंत जन्माला आले. रक्ताचा एकही …
Read More »‘दिशा’कडून विधवांना हळदी कुंकवाचा मान
पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू समारंभ ‘ती’च्या नजरेतून या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदीकुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच …
Read More »विधिज्ञ् नईमा घट्टेंच्या पनवेल कार्यालयाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. पनवेल न्यायालयात होणार्या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना …
Read More »दूषित पाणीपुरवठ्यामुळे भाजप खारघर मंडल आक्रमक
उपोषणाला बसण्याचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको …
Read More »दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज
पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले. …
Read More »आणखी एक यशस्वी टप्पा
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात लसमात्रा यशस्वी ठरली असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खालीदेखील आलेला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी नववर्षात प्रवेश केल्यानंतर चित्र …
Read More »चौकच्या नेताजी पालकर शाळेत हुतात्मा दिन
चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा संचलित चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हुतात्मा दिन झाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा …
Read More »करंजाडेत हळदीकुंकू समारंभ
करंजाडे : रामप्रहर वृत्त करंजाडे येथील सेक्टर 3मधील दुधे विटेवरी कॉम्पेक्समध्ये शनिवारी (दि. 29) हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या वेळी सोसायटीमधील सर्वधर्मीय 60 महिलांनी मराठमोळी पारंपरिक वेषभूषेत सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात गणरायांचे स्तवन आणि गुरूवंदनेने झाली. मकरसंक्रांत कशी व का साजरा केली जाते, तिळाचे लाडू का खाल्ले जातात, तसेच काळी …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा : सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या भेटीमुळे बालकलाकार झाले आनंदित!
पनवेल : प्रतिनिधी नागबादेवी कलामंच, वसई यांच्या एकांकिकेतील समर्थ, वरद आणि छोटी द्रोणा या बालकलाकारांची भेट सुप्रसिध्द अभिनेत संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांचे जवळ झाली असता त्यांना त्यांच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखा होता. मौनांतर-नागबादेवी कलामंच, वसई यांनी सादर केलेल्या एकांकिकेतील हे तीन बाल कलाकार …
Read More »‘मविआ’च्या घटक पक्षांत कुरबुरी; अहमदनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून टोलेबाजी
अहमदनगर : प्रतिनिधी मालेगाव येथील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे, मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का? आमचा नेमका मित्र कोण, हे कळत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper