Breaking News

महत्वाच्या बातम्या

कडावमध्ये भव्य आरोग्य शिबिर

कर्जत : प्रतिनिधी कडाव ग्रामपंचायत आणि सुमित श्रीमाळ आयुर्वेदिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कडावमध्ये पाच दिवसांच्या  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा लाभ परिसरातील ग्रामस्थ घेत आहेत. शिबिरामध्ये आयुर्वेदिक उपचारांवर भर दिला जात असून, हे शिबिर रविवार (दि. 6)पर्यंत सुरू राहणार आहे. कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील या आरोग्य शिबिराचे …

Read More »

वेलटवाडीतील आदिवासींचे पुनर्वसन करणार; युसुफ मेहेरअली सेंटरचे डॉ. जी. जी. पारिख यांची माहिती

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात अलिबाग वेलटवाडीतील आदिवासींच्या घरांचे नुकसान झाले होते. या 23 आदिवासींचे नियोजनबद्ध पुनर्वसन व्हावे यासाठी युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून काम करण्यात येईल, अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. जी. जी. पारिख यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. वेलटवाडीतील आदिवासींच्या पुनर्वसनासंदर्भात डॉ. पारीख यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची …

Read More »

उंबरखिंडीत विजय दिन उत्साहात      

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील चावणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, खालापूर पंचायत समिती आणि शिवदुर्ग मित्र मंडळ-लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 2)  तालुक्यातील उंबरखिंडीत 361 वा विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व महिला सरदार रायबाधन यांच्या फौजेवर उंबरखिंड (ता. खालापूर) येथे मोजक्या …

Read More »

कर्जतमध्ये जि.प. गट वाढणार नसल्याने निराशा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद गटांची संख्या वाढणार नाही. तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे पुर्वीप्रमाणे सहा गट राहणार आहेत. त्यामुळे सात गट होणार म्हणून तयारीला लागलेल्या इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, लोकसंख्या वाढल्याने सध्याच्या प्रभागातदेखील फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात असून मतदारांची संख्या वाढविण्याच्या नवीन नियमांमुळे …

Read More »

रोह्यात नथुराम मगर यांनी फुलवला कलिंगडचा मळा

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील बाहे हे गाव मिरची व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. याच बाहे गावच्या परिसरात कुंडलिका नदीच्या किनारी गेल्या चार-पाच वर्षापासून भाजीपाला व मिरची सोबत कलिंगडाचा मळा बहरताना दिसत आहे. रोहा तालुक्यातील वाशी येथील नथुराम मगर, अनंत मगर हे शेतकरी कलिंगड पिकासाठी प्रसिद्ध आहेत. यातील नथुराम मगर हे गेल्या …

Read More »

शहीद भाई कोतवाल चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

कर्जत : बातमीदार तालुक्यातील क्रांतिकारक यांच्या जीवनावरील दिवंगत माजी सरपंच प्रवीण पाटील निर्मित स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनच्या ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाला एमआयएफएफमध्ये पाच (अवार्ड) पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई अंधेरी येथील मेयर ऑडिटोरीयममध्ये नुकताच  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. त्याला अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ, उपस्थित होते. ‘शहीद भाई कोतवाल’ …

Read More »

मळा गावातील रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवा; अलिबाग प्रांताधिकार्‍यांचे पंचायत समितीला निर्देश

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मिळकतखार मळा येथील रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी अलिबाग पंचायत समितीला दिल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार गु्रपग्रामपंचायत हद्दीत मळा हे 40 उंबर्‍यांचे सुमारे दीडशे लोकसंख्या असलेले गाव. या गावासाठी 2002-03 साली नाबार्ड मार्फत  ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत साडेदहा …

Read More »

बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट ; जत्रा रद्द

पाली : प्रतिनिधी सुधागड पाली येथील बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव शुक्रवारी (दि. 4) कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी  यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त बल्लाळेश्वर मंदिर व  परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र निर्बंध घालण्यात आल्याने यावर्षी …

Read More »

विहुर येथे ड्रोन कॅमेर्‍याद्वारे शूटिंग करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

मुरूड : प्रतिनिधी समुद्रकिनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांनादेखील विहुर ग्रामपंचायत हद्दीतील मैदानाचे ड्रोन कमेर्‍याद्वारे शूटिंग करणार्‍या दोघाजणांविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील विहुर ग्रामपंचायत हद्दीत रौद नावाचे मोठे मैदान आहे. या परिसरातील जागा एका धनिकाने विकत घेतली आहे. जागा मालक आणि विहूर ग्रामस्थ यांच्यात वाद …

Read More »

सावित्री नदीत बुडी पद्धतीने रेती उत्खननासाठी राखीव क्षेत्राची मागणी

महाड : प्रतिनिधी बुडी मारून रेती उपसा करण्यासाठी पुर्वीप्रमाणेच  सावित्री नदीत विचारेवाडी ते दासगाव आणि दासगाव ते सव या दरम्यान राखीव क्षेत्र ठेवले जावे, अशी मागणी पारस हातपाटी वाळू उत्खनन विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून वाळू व्यावसायिकांनी केली आहे. महाड तालुक्यातील भोई व इतर समाजातील लोक गेल्या अनेक पिढ्या सावित्री नदीमध्ये …

Read More »