अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 3) किशोरवयीन (15 ते 18 वयोगट) मुलामुलींच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. त्याला युवापिढीकडून चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरण होणार असल्याने मुलामुलींनी पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. सुमारे दीड लाख मुलामुलींना याचा लाभ होणार आहे. अलिबाग येथील डोंगरे हॉलमध्ये झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; रायगड केंद्राची प्राथमिक फेरी उत्साहात
पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी (दि. …
Read More »राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित …
Read More »मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनासोबतच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच ओमायक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात
पनवेल ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सोमवारी (दि. 2) देशभरात प्रारंभ झाला. पनवेल महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांत असेलल्या 10 शाळांमध्येदेखील लसीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत 4500 मुलांचे लसीकरण झाले. पनवेल मनपा क्षेत्रातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन के. व्ही. …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
सुदैवाने एकाचाही मृत्यू नाही अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारावर पोहचली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत दुपटीने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असले तरी अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही ही समाधानाची बाब आहे. डिसेंबर महिन्याच्या …
Read More »सहजसेवा निसर्ग शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
खालापूर : प्रतिनिधी सहजसेवा फाउंडेशन या संस्थेने खालापूर तालुक्यातील महड येथे वीटभट्टी कामगार व मजुरांच्या मुलांसाठी निसर्ग शाळा सुरू केली आहे. वावोशी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. प्रदीप नथुराम पाटील यांनी या शाळेतील मुलांची रविवारी (दि. 2) वैद्यकीय तपासणी केली. सहजसेवा फाउंडेशनच्या निसर्ग शाळेच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था …
Read More »बोर्ली बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त; महसूल खात्याची कारवाई; इतर अनधिकृत बांधकामेही पाडणार
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ली एसटी बसस्थानक परिसरातील सरकारी जागेवरील अतिक्रमणे महसूल विभागाने जमीनदोस्त केली. या परिसरातील अन्य बेकायदेशीर बांधकामे हटवून ही जागा महसूल विभाग ताब्यात घेणार आहे. बोर्ली एसटी स्थानक परिसरातील गट क्रमांक 65 या सरकारी जागेत स्थानिक लोकांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. बोर्ली स्थानक परिसरातील सरकारी जागेवर झालेली …
Read More »कर्जत-मुरबाड मार्ग मृत्यूचा सापळा!; रात्रीचा प्रवास धोकादायक
कर्जत : प्रतिनिधी राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कर्जत-मुरबाड या मार्गाचे काँक्रीटीकरण करीत आहे, मात्र हे काम सलग न करता अनेक ठिकाणी 10 मीटर लांबीचे भाग अर्धवट सोडण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहेत. दरम्यान, या मार्गावरील अर्धवट असलेल्या कामांच्या ठिकाणी ‘रस्ता बंद …
Read More »कोणी क्रीडांगण देता का? क्रीडांगण…
महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या तालुक्यात एकही क्रीडांगण नाही, ही तर शरमेची बाब म्हणावी लागेल. महाडमध्ये मुलांना खेळण्यासाठी असलेल्या दोन मैदानापैकी एक चांदे मैदान आणि दुसरे भिलारे मैदानही ऐन पावसाळ्यात चिखल आणि गवताने व्यापले जाते. यातील भिलारे मैदानाकडे महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने या मैदानावर उनाड तरुणांचा वावर वाढला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper