Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महानगरपालिका आयुक्त निवासाचे भूमिपूजन

खारघर ः महानगरपालिका आयुक्त निवासाचे भूमिपूजन उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.

Read More »

अमली पदार्थविरोधी कार्यशाळेत ‘सीकेटी’चा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 30 स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन, तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई …

Read More »

कामोठे शहरामध्ये क्रीडासंकुल व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे व आज ती दोन ते अडीच लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे, तसेच या वाढत्या लोकसंख्येनुसार युवकांची संख्या देखील वाढत आहे, परंतु कामोठे शहरामध्ये तेथील युवकांसाठी खेळण्यासाठी एकही क्रीडा संकुल नाही. त्यासाठी तेथील युवकांना खेळण्यासाठी पनवेल, …

Read More »

माजी विद्यार्थी असणार्या अध्यापकांकडून भेटवस्तू

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये या विद्यायालयाचे माजी विद्यार्थी असणारे अध्यापक व अध्यापिका चित्रा पाटील, वाय. एस. पाटील, ऊर्मिला गोंधळी, प्रा. एम. के. घरत यांच्या वतीने विद्यालयास 35 खुर्च्या व 10 पंखे भेट देण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणात …

Read More »

तळोजातील उद्योगांची 75 टक्के पाणीकपात

प्रदूषण रोखण्यासाठी एमआयडीसीचा उपाय पनवेल ः बातमीदार तळोजा सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रदूषणाची मात्रा कमी करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने ‘रामबाण’ उपाय शोधला आहे. महामंडळाच्या अधिकार्‍यांनी उच्चपदस्थांच्या आदेशाने थेट 50 टक्के पाणीकपातीच्या नोटिसा पाठवून पाणीकपात सुरू केली आहे. तळोजामध्ये पाचशे कारखाने आहेत. तळोजा सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 21.5 दशलक्ष लिटर …

Read More »

आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

खारघर : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 13) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 43 शाळांमधील 45 शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. …

Read More »

पनवेल तालुक्यात विकासपर्व

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासाचा नवा झंझावात सुरू झाला आहे. शासकीय योजनेंतर्गत, तसेच आस्थापनांच्या माध्यमातून विविध कामांची भूमिपूजने करण्यात येत असून, यामुळे तालुक्यातील जनतेला विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. धानसर येथे विकासकामांचा शुभारंभ पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेजच्या …

Read More »

गव्हाण विद्यालयात अभिरूप शाळा; विद्यार्थी वावरले शिक्षकांच्या भूमिकेत

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभिरूप शाळा भरविण्यात आली. या वेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिपायांपासून शिक्षक, प्राचार्यापर्यंत सर्व भूमिका पार पाडल्या. प्राचार्या तनिष्का म्हात्रे, पूजा बगाटे, स्वयंम कोळी यांच्यासह 80 विद्यार्थ्यांनी शिक्षक, ग्रंथपाल, …

Read More »

भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी जयेश पाटील

मोहोपाडा ः वार्ताहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयेश संभाजी पाटील यांनी कमळ हातात घेतले आहे. त्यांची तालुक्यातील युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकताच झालेल्या पक्ष  प्रवेश सोहळ्यात माजगाव, आंबिवली येथील तरुणांनी प्रक्षप्रवेश केला. यामुळे या परिसरात पक्ष वाढण्यासाठी मदत होईल. जयेश पाटील यांना महेश बालदी यांच्या हस्ते …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयासाठी नगरसेवक राजू सोनींची आर्थिक मदत

पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबरोबर आतील कामाच्या पूर्ततेसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनावरून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी 50 हजाराचा धनादेश रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. विकास कामासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद …

Read More »