उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) होणार्या थेट सरपंच आणि तीन प्रभागांतील नऊ सदस्यांच्या निडणूक प्रक्रियेसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तीन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या ग्रामपंचायतीमध्ये 896 पुरुष व 896 महिला अशी एकूण 1792 मतदार …
Read More »पनवेल तालुक्यातील सहा पुलांच्या कामाला मंजुरी
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील सहा पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यातील तीन ठिकाणचे जुने पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. एका ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असून, दोन ठिकाणच्या पुलांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. या पुलांसाठी तब्बल सव्वा पाच …
Read More »स्वतःला ओळखा, क्षेत्र निवडा आणि प्रतिभा निर्माण करा
अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून यशाची त्रिसूत्री पनवेल : बातमीदार प्रत्येक जण बुद्धिवान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. त्यामुळे स्वतःला ओळखा, त्यानंतर क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा निर्माण करा. ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितली, तसेच त्यांनी योगा करण्याचा सल्ला दिला. …
Read More »‘ती’ हत्या लुटीच्या उद्देशाने
अर्धवट जळालेल्या मृतदेहाची उकल; पाच आरोपी गजाआड पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानकालगतच्या झुडपामध्ये आढळून आलेल्या अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात, तसेच त्याची हत्या करणार्या पाच आरोपींना जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. अमरजितसिंग पाल असे या हत्या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव असून, त्याची हत्या लूटमारीच्या उद्देशाने केल्याचे …
Read More »रायगडच्या प्रणितची अवकाशभरारी
नासा’च्या मंगळ मोहीम संशोधनासाठी निवड पनवेल : बातमीदार सायंटिस्ट अस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट प्रणित पाटील या अलिबागच्या सुपुत्राची अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहिमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मूळचे अलिबागचे असलेले पाटील कुटुंब सध्या पनवेलमध्ये वास्तव्यास आहे. प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. …
Read More »सुकापूरमध्ये रस्तेकामाचा शुभारंभ
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाली देवद-सुकापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष …
Read More »पनवेल मनपा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश खानावकर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते दिनेश रवींद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दिनेश खानावकर यांना कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, राजू बनकर …
Read More »प्रभाग समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ची सभा शुक्रवारी (दि. 22) झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेस महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. या सभेत आसूडगाव, हनुमानपाडा येथील भाऊ भोपी ते …
Read More »राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी 4,500 कोटींची तरतूद?
मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळ, नापिकी, तसेच आर्थिक गर्तेत अडकलेल्या राज्यभरातील शेतकर्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने दिलासा दिल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारनेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत शेतकर्यांसाठी नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र नसलेल्या शेतकर्यांसाठी ही …
Read More »सोनारीत भाजप-शिवसेना युतीचा झंझावात
जेएनपीटी : प्रतिनिधी सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या रविवारी (दि. 24) पार पडणार आहे. निवडणुकीला ताकदीने सामोर्या जाणार्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी (दि. 22) सोनारी गावात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांचा तसेच सदस्यपदाच्या नऊ उमेदवारांचा विजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper