Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच त्यांच्या आणि विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. वीजपुरवठा व त्या अनुषंगाने …

Read More »

खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी

अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी पनवेल : वार्ताहर चैन स्नॅचींग करणार्‍या लुटारूंनी खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये दोघांच्या अंगावरील सुमारे 92 हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. खारघर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. खारघर सेक्टर 7 मध्ये राहणार्‍या विमल झरेकर …

Read More »

कळंबोलीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शिक्षकांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त वरिष्ठांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि आई-वडिलांचे पाठबळ कायम राखत मोठी झेप घ्या, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सत्कार समारंभात बोलत होते. नवरत्न युवा संघटनेच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा …

Read More »

पनवेल महापालिकेचा मालमत्ता करवसुलीचा उच्चांक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत 135 कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता करवसुली केली आहे. मालमत्ता कर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत 46 हजार 154 मालमत्ताधारकांनी 135 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाद्वारे सुविधा दिलेल्या डिजिटल माध्यमांमार्फत देयकांच्या संकलनात लक्षणीय वाढ झाली …

Read More »

भाताण परिसरात झालेल्या अपघातात एक ठार तर चौघे जखमी

पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात भरधाव कार स्लीप होऊन कारची शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर लागून कार खड्ड्यात जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर आज सकाळी टाटा …

Read More »

वनमहोत्सव सप्ताहातंर्गत पळस्पे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वनमहोत्सव सप्ताहातंर्गत अलिबाग वनविभाग पनवेल वनपरिक्षेत्रातील पळस्पे येथे रविवारी (दि. 2) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल वनपरिक्षेत्र सहाय्यक वन संरक्षक संजय वाघमोडे, वन परिक्षेत्र अधिकारी निलेश भुजबळ, वन …

Read More »

पनवेल येथील गुजराती समाजाच्या वैकुंठधाममध्ये गॅस शवदाहिनीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील गुजराती समाजाच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत या समाजाच्या वतीने लोकसहभागातून वायु संचलित शवदाहिनी सुरू करण्यात आली आहे. या शवदाहिनीचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) झाले. शवदाहिनी लोकार्पणास भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी …

Read More »

पनवेलमधील रोटरी घनदाट जंगल व बागेच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त प्राणवायूसाठी वृक्षसंपदा आवश्यक आहे. याचाच विचार करून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि महापालिकेच्या वतीने शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटलशेजारी असलेल्या भूखंडावर मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट (घनदाट जंगल) आणि बाग हा प्रकल्प साकारला आहे. ‘रोटरी’चे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या नामफलकाचे अनावरण …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा : अभिजीत पाटलांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानेही फेटाळला

पनवेल : प्रतिनिधी शेकाप नेते, माजी आमदार, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे चिरंजीव व बँकेचे संचालक अभिजीत पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 30) फेटाळला. या वेळी उच्च न्यायालयात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला चहावाला रवींद्र मगर यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील चहावाले रवींद्र मगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता. पनवेलचा चहावाला दिल्लीच्या गौरवास पात्र झाल्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मगर यांचा शुक्रवारी (दि. 30) येथे सत्कार केला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील पदपथावरील चहाविक्रेते …

Read More »