Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आपला दवाखानाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर सेक्टर 12 येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित झाला आहे. या योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले, तर खारघरमध्ये आपला दवाखानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. …

Read More »

पनवेलमध्ये इन्कोव्हॅक लसीकरण सुरू

नाकावाटे घेतली जाणारी लस आरोग्य केंद्रांवर उपलब्ध पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लस महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावरती उपलब्ध  करून देण्यात आली आहे. इन्कोव्हॅक लसीकरण शनिवार (दि.29) पासून पनवेल महापालिकेच्या  सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे. 60 वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील कृती समितीची बैठक

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शनिवारी (दि. 29) झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. …

Read More »

खारघरमधील कोपरा गावातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

पनवेल : वार्ताहर खारघरमधील कोपरा गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या दोन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने अटक केली. दोघेही मागील 19 ते 20 वर्षांपासून खारघर भागात राहत असल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने या दोघा बांग्लादेशी नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मूळचा बांगलादेशी असलेल्या मोहम्मद …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून गव्हाण येथे स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 2 मेदरम्यान गव्हाण येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील …

Read More »

कारवाईचा फास आवळू लागल्याने कर्नाळा बँक संचालकांचे धाबे दणाणले!

सीईओ अपर्णा वडके यांना न्यायालयीन कोठडी पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सीईओ अपर्णा वडके यांना शनिवारी (दि. 29) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या घोटाळाप्रकरणी कारवाईचा फास आवळू लागल्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले असून घोटाळ्याचे सूत्रधार शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे …

Read More »

पनवेलमधील ऑक्सिपार्कचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपाजवळ कोशिश फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिपार्कचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते व कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी (दि. 27) अनमोल रिश्ते या थीमखाली नववे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात रंगले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी लाईव्ह ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. …

Read More »

आदिवासी ठाकूर समाजातील कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार

घरकुल, पाणी आणि पुनर्वसनाबाबत आमदार महेश बालदी, प्रांताधिकारी यांची बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त आदिवासी समाजातील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी समाजाकरिता घरकुलांसाठी जागा व जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी राहुल मुंडके …

Read More »

न्यायालयीन लिपिकाची लुटमार करणारे दोघे गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडयाळ, रोख रक्कम साडे पाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अटक केली आहे. पनवेल …

Read More »