Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बसखाली येऊन अल्पवयीन बाईकस्वाराचा मृत्यू

नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ जिमखाना सेक्टर 28 नवी मुंबईच्या गेटजवळ बाईकस्वराचा बसखाली येऊन मृत्यू झाला. विवेक पटवा असे मृत तरुणाचे नाव असून तो 17 वर्षांचा होता. या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असली तरी अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवली जात असल्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. …

Read More »

मोखाड्यात शनिवारी लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय नूतन इमारत उदघाटन व नामकरण समारंभ

‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार, मंत्री रवींद्र चव्हाण, चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील आदी मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त …

Read More »

पनवेल मनपा मालमत्ता कराविरोधातील खारघर सोसायटीज फेडरेशनची याचिका हायकोर्टाने फेटाळली

पनवेल : प्रतिनिधी खारघर कोपरेटिव्ह हौसिंग सोसायटीज फेडरेशन लि.च्या वतीने पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात दाखल केलेली रिट पिटीशन गुरुवारी (दि. 6) उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने फेटाळली. ही याचिका कायद्यात किंवा तथ्यावर टिकू शकत नसल्याचे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चपराक लगावली आहे. पनवेल …

Read More »

बामणडोंगरीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून खेळाडूंचा सन्मान; मंदिरासाठी पाच लाखांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात हनुमान जन्मोत्सव गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त बामणडोंगरी येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. …

Read More »

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल भाजपच्या वतीने शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

विद्यार्थ्यांनी तयार केली दुचाकीसाठी एअर बॅग

नवी मुंबई ः बातमीदार रस्ते अपघातामध्ये चारचाकी वाहनांतील एअर बॅगमुळे प्रवाशांना इजा न होता त्यांचे प्राण वाचतात, परंतु चारचाकी वाहनाप्रमाणे दुचाकी वाहनांसाठी अशी सुरक्षा प्रणाली असण्याची गरज सर्व स्तरातून होत होती. नवी मुंबईच्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी यावर संशोधन करून दुचाकीसाठी एअर बॅग तयार केली आहे. त्यांच्या या संशोधनाचे कौतुक होत …

Read More »

सोशल मीडियाद्वारे मैत्री वाढवून तरुणीवर अत्याचार

पनवेल ः वार्ताहर पनवेल भागात राहणार्‍या एका 20 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवरून 19 वर्षीय तरुणीसोबत मैत्री वाढवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तरुणाने पीडितेसोबत लग्न करून तिच्यासोबत पुण्याला राहण्याचे आश्वासन देऊन लग्नानंतर लागणारा खर्च म्हणून तिच्याकडून 71 हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. …

Read More »

जबरी चोरी करणारी टोळी गजाआड

अवघ्या दोन तासांत पोलिसांकडून अटक पनवेल ः वार्ताहर ओलाचालकाच्या कारला कट मारून त्याला शिवीगाळ करून त्याच्या खिशातील पाकीट व कारमधील दोन मोबाईल फोन जबरीने काढून घेणार्‍या पाच सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, …

Read More »

महिलेचा खून करून फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

उरण : प्रतिनिधी महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 2 आरोपींना 24 तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज (38) धंदा गृहिणी, राह. रवींद्र घरत यांची चाळ, से.15, शेलघर, ता. पनवेल जि. रायगड, मुळ राह जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड 8 …

Read More »

पनवेल एसटी आगाराच्या कामाला आता मुहूर्त सापडणार

नितीन देशमुख- मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या एसटीच्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात. 2009 साली पनवेल स्थानकातील जुनी इमारत पाडल्यानंतर या स्थानकात पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यासाठी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला होता, पण …

Read More »