Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा कमी करावी

पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाची मागणी   पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा दोन महिन्यांवरून 14 दिवसांची करण्यात यावी, अशी मागणी पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितच्या वतीने कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. …

Read More »

उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे दाखल

उरण : रामप्रहर वृत्त पाऊस लांबल्याने ऑक्टोबर हिट ही उशिरा सुरू झाली असून आठवडा भरापासून सुरू झालेल्या कडक उन्हात अंगाची काहिली होत आहे. ती शमविण्यासाठी उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे आले आहेत. मात्र ताडगोळ्यांचे आगमन लांबल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे 120 डझन आहे. ताडगोळे महाग असले तरी त्याला …

Read More »

रसायनीत, उरण येथे छठपुजा साजरी

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसराने वेढलेला भाग  असल्याने या परीसरात कामानिमित्त व व्यवसायासाठी आलेले हिंदी भाषिक नागरिकांची मोठी संख्या आहे. हे नागरिक गेल्या पंचवीस वर्ष छठपुजा उत्सव मोहोपाडा तलाव, रिस पुल व पाताळगंगा नदीकाठी मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. रसायनीतील मोहोपाडा तलाव, रिस पुलाजवळ हिंदी भाषिक नागरिक …

Read More »

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात प्रतिमापूजन

उरण : वार्ताहर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दिन व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांचे जीवन कार्य व त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व डॉ. …

Read More »

रसायनीत शपथ आणि दौड कार्यक्रम

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली शपथ आणि दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त रसायनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार आणि नागरिक …

Read More »

प्रकल्पग्रस्तांकडून बीपीसीएल कंपनीला गेटबंद आंदोलनाचा इशारा

उरण :  प्रतिनिधी बीपीसीएल कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांनी न्याय मिळवून घेण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी बीपीसीएल कंपनीला गेटबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला उरण तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे 150 प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील 30 वर्षांपासून अद्यापही नोकर्‍यांपासून वंचित आहेत. या प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांचा नोकर्‍यांसाठी गेल्या …

Read More »

पनवेल परिसरात छट्पूजेचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा सर्वांत मोठा सण छट्पूजा साजरा केला जातो. आपली संस्कृती, श्रद्धा निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा म्हणजे सूर्यपूजेची परंपरा आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील वडाळे तलाव, खांदेश्वर येथील तलाव आणि नवीन पनवेल येथील आदई तलावाजवळ छट्पुजेचे आयोजन सोमवारी (दि. 31) करण्यात …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा

उरण : बातमीदार, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक संकुलात सोमवारी (दि. 31) राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार …

Read More »

दुर्गदर्शन सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता

पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने नवीन पनवेल येथे श्री सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्या आली होती. या दुर्गदर्शन सोहळ्यात विविध उपक्रम प्रतिष्ठानकडून राबविण्यात आले. या सोहळ्याची रविवारी (दि. 30) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने …

Read More »

शेडुंग येथे सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील जय मल्हार सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बिल्डर गजानन खबाळे, माजी सरपंच व कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुभाष जेठू पाटील, युवा नेते योगेश लहाने, सदस्य मोहन दुर्गे, रामदास खेत्री, शांताराम …

Read More »