Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्याबाबत ठराविक मुदतीत उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी सिडको वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठोस उपाययोजना ठराविक मुदतीत कराव्यात; अन्यथा आमचे सरकार असले तरी आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) सिडकोच्या बैठकीत दिला. दिवाळीत गरज असेल तिथे सिडकोने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी या …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी दिवाळी पहाट सांगीतिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे होणार आहे. दरवर्षी …

Read More »

‘रामप्रहर’ने दिवाळी अंकांची परंपरा जपली -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त दै. रामप्रहरच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. अगदी कोरोना काळातही त्यात खंड पडला नाही. ‘रामप्रहर’ने दिवाळी अंकांची परंपरा जपली आहे. यंदा पर्यटनावर आधारित अंक काढून छान माहिती देण्यात आली आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 22) येथे काढले. ‘रामप्रहर’च्या …

Read More »

शेतकर्‍यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन!

भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया पनवेल : रामप्रहर वृत्त नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करून सात लाख शेतकर्‍यांना निधी दिला. शेतकर्‍यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल …

Read More »

शासनाच्या आनंदाचा शिधा वितरणास पनवेलमध्ये प्रारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील आसुडगाव गावात राज्य शासनाच्या आनंदाचा शिदा वितरण कार्यक्रम भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 21) झाला. या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सुमारे सात कोटी सर्वसामान्य नागरिकांना चार वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. राज्यातील गरिबांची दिवाळी …

Read More »

उरण महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. उरण येथील शासकीय धान्य कोठार परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पॉलिथिन, कॅरीबॅग व इतर घनकचरा गोळा केला व परिसराची स्वच्छता केली व जमा झालेल्या …

Read More »

मोठीजुई शाळेत महिला स्वयंसहाय्यता गटांनी भरविले विविध प्रकारचे स्टॉल्स

उरण : बातमीदार उरण तालुका पंचायत समिती एनआरएलएम विभाग अंतर्गत ग्रामपंचायत मोठी जुईच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई येथे गावातील विविध स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे दिवाळी निमित्ताने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ व वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उरणचे सांख्यिकी विस्तार अधिकारी सुरेंद्र पालव यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

नितीन पाटील यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त ‘भव्य किल्ले’ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त जाणीव एक सामाजिक संस्था पनवेलचे संस्थापक अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.18 अंतर्गत दिवाळीनिमित्त ’भव्य किल्ले’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची बुधवारी (दि. 19) नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण मराठीत ‘राष्ट्रीय रोखे बाजार’ (एनएसई) असे …

Read More »

पनवेल मनपातर्फे बचत गटांच्या महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम

पनेवल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 16 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानुसार माझी वसुंधरा अभियानांतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता के दो रंग हरा गिला, सुखा निला’ या उपक्रमाची बचत गटाच्या महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या …

Read More »