पनवेल : वार्ताहर पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 28) आरक्षण जाहीर झाले आहे. पनवेल पंचायत समितीच्या 18 जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 4 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन जागा, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक जागा आरक्षित झाली …
Read More »महावितरणला आंदोलनाचा इशारा
वायरमन, लाईनमनची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त येत्या पंधरा दिवसांत वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दिले आहे. तशा आशयाचे त्यांचे निवेदन गुरुवारी …
Read More »अखेर जेएनपीए प्रशासन झुकले
भाजप पदाधिकार्यांमुळे कंत्राटी कामगारांच्या पगार वाढीचा करार पूर्ण उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीएमधील कॉन्ट्रॅक्ट (कंत्राटी) वर्कर्सच्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका व आमदार महेश बालदी यांच्या यशस्वी मध्यस्तीने जेएनपीए प्रशासन अत्यंत जलद गतीने कार्यरत होऊन कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स पगारवाढीचा करार जेएनपीए जनरल कामगार संघटनेसोबत मंगळवारी जेएनपीए …
Read More »वाजेकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार, नोकरभरती
पनवेल : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीआयसीआय व एनआयआयटी तर्फे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व नोकरभरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक आयक्यूएसीचे प्रमुख डॉ. आर. बी. पाटील यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट सेलचे चेअरमन …
Read More »लिमये सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.24) सुनीता एस. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीस ज्ञात-अज्ञात मृत्यू झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रायगड जिल्हा ग्रंथालय संघ अलिबाग संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांचे स्वागत करण्यांत आले. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जोशी …
Read More »बचत गटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहचवा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे साहिल महिला बचत गटाचे रास्त भाव धान्य दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी त्यांनी महिलांपर्यंत विविध लाभदायक योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्याध्यापक सुरेश पाटील यांना सेवानिरोप पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश काशिनाथ पाटील 35 वर्षे प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय साहित्याचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि राज्य शासनाच्या इसीआरपी अंतर्गत पनवेल येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला विविध वैद्यकीय मेडिकल साहित्य देण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) झाले. या वेळी आमदार …
Read More »नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने खारघरमध्ये बुस्टर डोस शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पनवेल महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील या कायम तत्पर असतात. रेजीन्सी क्रिस्ट, केसर गार्डन, जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी कोविड बुस्टर डोस घेतला. नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने शनिवार व रविवारी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड बुस्टर …
Read More »छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही
सकल मराठा समाजातर्फे पनवेल प्रांताधिकार्यांना निवेदन पनवेल : वार्ताहर तिरुपती बालाजीच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली वाहने अडविल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यापार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अशी भूमिका मांडत पनवेल प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. तिरुपती बालाजी याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भाविक दर्शनासाठी जातात. त्यापैकी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper