पनवेल : वार्ताहर येथील सुप्रसिद्ध अशा केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्ष अमित ओझे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सदस्य अविनाश कोळी यांची पतपेढीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने अविनाश …
Read More »सीकेटी महाविद्यालयाचा बारावीचा 98.64 टक्के निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाचा 98.64 टक्के निकाल लागला आहे. त्याद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सीकेटी विद्यालयाच्या सायन्स विभागातून 91.33 टक्के गुण मिळवत वेदांत गायकर याने प्रथम, 86 टक्के गुण मिळवत …
Read More »पनवेल महापालिकेत दोन महिन्यांमध्ये 22 कोटी 937 रुपये मालमत्ता कर जमा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन महिन्यांत 22 कोटी 937 रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात मार्चपर्यंत 108 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला होता. महापालिकेला वर्षाला 210 कोटी रुपये मालमत्ता कर जमा होणे अपेक्षित आहे. पनवेल महापालिका हद्दीत तीन लाख …
Read More »पनवेल मनपा इंग्रजी माध्यम शाळेच्या ज्युनिअर केजीची प्रवेश प्रकिया सुरू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होत आहे. या शाळेच्या ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण मोफत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी 15 जूनपर्यंत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
खारघर : बारावीच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयातून विज्ञान शाखेमधून आकांशा लालमन गुप्ता (95%) प्रथम, सैमा युनूस शेख (84.17%) द्वितीय व यासिर इम्रान डिवदे (78.67%) तृतीय आला, तर वाणिज्य शाखेतून भावना दिनेश रावारिया (91%) प्रथम, …
Read More »गव्हाण विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल 98.57 टक्के
कला, वाणिज्य दोन्ही शाखेत मुलींचीच बाजी पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजचा एचएससी अर्थात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2022चा निकाल 98.57 टक्के लागला असून कॉमर्स विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल 97.91 टक्के इतका लागला. …
Read More »पनवेलमध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व
भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन …
Read More »पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण
मोहोपाडा : प्रतिनिधी इंदेमित्सु ल्युब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पनवेल ते रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील जांभिवली सायकल अशी सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी जांभिवली येथे रॅली आल्यानंतर …
Read More »पनवेलमध्ये जाणीव सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ
पनवेल : वार्ताहर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जाणीव या सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ सोहळा घरगुती स्वरूपात नवीन पनवेल येथे बांठीया विद्यालयात झाला. कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख वक्ते निसर्ग मित्रचे डॉ. आशिष ठाकूर यांनी दैनंदिन जीवनातील पर्यावरण संतुलन कसे ठेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ विश्वस्त डॉ. सतीश उमरीकर …
Read More »सीकेटी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला. या दिनाचे महत्त्व महाविद्यालयीन युवक-युवतींना पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय कॅडेट कॉप्स यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper