चाचण्यांवर भर; आतापर्यंत 13 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या एक अंकी झाली आहे. निर्बंध शिथिल करून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले तरी पुन्हा चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिका प्रशासनाकडून दैनंदिन चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात 12 लाख …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात जलसंवर्धन
जलशक्ती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्रीय जलशक्ती अभियानांतर्गत जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधून या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल …
Read More »सीकेटी कॉलेजमध्ये सीकेटीएन्स फिल्म सोसायटीची स्थापना
पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट निर्मिती विषयी तसेच चित्रपटाबद्दल अभ्यासक वृत्ती वाढविण्याच्या हेतूने रविवारी (दि. 27) जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सांस्कृतिक विभाग, इंग्रजी विभाग आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ …
Read More »सुभाष काटकर यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आर्थिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 11 येथील स्वस्तिक प्लाझा सोसायटीत काही दिवसांपूर्वी एका भोजनालयाला आग लागली होती. यामुळे भोजनालयाच्या वर पहिल्या मजल्यावर राहणारे सुभाष महादेव काटकर यांच्या घराला या आगीची झळ लागून घराचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना मदत म्हणून भाजप कामोठे शहराच्या वतीने आत्तापर्यंत 3 लाखांची मदत …
Read More »कामोठ्यातील मिसळ महोत्सवाची सांगता; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चार दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता रविवारी (दि. 27) झाली. या महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद घेता आला. या महोत्सवाच्या समरोपावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ठरित्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवज हॉटेलचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील तारा या गावाजवळ शिवज हे प्युअर वेज हे हॉटेल सुरू झाले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. भाजपचे बुथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीपशेठ जेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून, या हॉटेलचा उद्घाटन सोहळा रविवारी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मते-पाटील कुटुंबीयांचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवकर येथील मते-पाटील कुटुंबियांच्या वतीने गावामध्ये करण्यात आलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. पनवेल तालुकयातील शिवकर गावातील मते-पाटील कुटुंबीयांनी सन 2017 ते 2021 पर्यंत विविध सामाजिक उपक्रमे राबवली आहेत. त्याची माहिती अमित पाटील, संतोष मते, चिंतामण पाटील, मछिंद्र मते …
Read More »जेएनपीटीचे होणार आधुनिकीकरण
गेट ऑटोमेशनपासून इंटर टर्मिनल ट्रान्स्फर सीस्टिमची सुविधा; उत्पन्नातही वाढ उरण : वार्ताहर जेएनपीटीने ईझ ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत बंदरामधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. सर्व कामांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. गेट ऑटोमेशनसह सर्व टर्मिनल्सला जोडणारी इंटर टर्मिनल ट्रान्सफर सीस्टिम विकसित केली आहे. निर्यात कंटेनरसाठी थेट पोर्टमध्ये …
Read More »फ्रान्सच्या परिवहनमंत्र्यांची जेएनपीएला भेट
भारत-फ्रान्सदरम्यान बंदर व्यापार संबंध होणार मजबूत उरण : प्रतिनिधी फ्रान्सचे परिवहनमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी रविवारी (दि. 27) जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) या भारतातील प्रमुख कंटेनर बंदरास भेट दिली. या भेटीमुळे भारत-फ्रान्स यांच्यातील जमीन, हवाई आणि सागरी वाहतूक व बंदर व्यापार संबंध अधिक मजबूत होणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान फ्रान्सच्या …
Read More »नवीन पनवेलमध्ये राजस्थानी महिलांकडून दशामाता दिन
पनवेल ः प्रतिनिधी राजस्थानी महिलांनी रविवारी नवीन पनवेलमधील विचुंबे पुलाजवळ असलेल्या पिंपळाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळून दशामाता दिन साजरा केला. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमीला बिहार आणि राजस्थानमध्ये दशामाता पूजा केली जाते. दहाव्या दिवशी महिला पारंपरिक पोशाख करून पिंपळा समोर पतवाढीची पूजा करतात. नंतर पिंपळाला सात प्रदक्षिणा मारून त्याला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper