रसायनी : प्रतिनिधी येथील पिल्ले कॉलेजमध्ये झालेल्या युफेरीया जल्लोषमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार किशोरी शहाणे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. या वेळी ढोल पथकाचा कार्यक्रम तसेच विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. कॉलेजने कला अॅकॅडमी सुरू करावी …
Read More »संतप्त न्हावा ग्रामस्थांची सिडको भवनवर धडक; अधिकार्यांना घेराव
उरण : प्रतिनिधी दररोज पाच तास पाणीपुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि 15 दिवसांत फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 21) सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला. न्हावा ग्रामपंचायतींची न्हावाखाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ‘रयत’साठी आदर्श वास्तू ठरणार : डॉ. अनिल पाटील
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुर्णाकृती शिल्पाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त गुणात्मक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रयत संस्थेसाठी आदर्श वास्तू ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) …
Read More »जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी प्राजक्ता अंकोलेकरची निवड
पनवेल : प्रतिनिधी दक्षिण कोरियात होणार्या जागतिक तायक्वांडो पुमसे स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना व इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये रायगड व नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर हिने सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात …
Read More »पेण यंगिस्तान संघ डीपी कपचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे डॉक्टर्स असोिएशनतर्फे डॉक्टर फ्रेंण्डशीप कप क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रमोद गांधी यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या क्रिकेट स्पर्धेत पेण यंगिस्थान संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत तळोजा टायगर क्रिकेट …
Read More »जलतरणपटू ओमकार माळीने जिंकली पाच सुवर्णपदके
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील करंजा सुरकीचापाडा येथील रहिवासी ओमकार सदानंद कोळी यांनी धुळे स्नेहानगर येथे झालेल्या दुसर्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पाच सुवर्णपदके जिंकली. या कामगिरीमुळे केरळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ओमकारने 100, 200 व 400 मीटर फ्री स्टाईल, 200 …
Read More »छावा फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी करिअर मार्गदर्शन
पनेवल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील छावा फाउंडेशन ट्रस्टतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी रविवारी (दि. 20) अकुर्ली नवीन पनवेल येथे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी विद्यार्थी सुनीलकुमार पंडा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिराचा 50 मुलांनी लाभ घेतला. सुनीलकुमार पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. शिबिरादरम्यान …
Read More »आवक घटल्याने घाऊक बाजारात लिंबू महागले
प्रतिकिलोचे दर 90 ते 100 रुपयांवर पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या उन्हाची काहिली सुरू असल्याने लिंबाची मागणी वाढली आहे. असे असताना आवक 50 टक्के घटल्याने लिंबू महाग झाले आहे. दरात प्रतिकिलो 40 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 50 ते 60 रुपये प्रतिकिलो असलेले दर 90 ते 100 रुपयांवर गेले …
Read More »सीआयएसएफ कर्मचार्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर
उरण ः वार्ताहर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल युनिट ओएनजीसी मुंबईच्या उरण कंटींजेन्टमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिर उत्साहात झाले.शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि. 21) सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईचे कमांडेंट ललित शेखर झा यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ मुंबई रिजनचे विविध युनिटमधील जवान सहभागी झाले. हे शिबिर शनिवारी …
Read More »चिंध्रणमध्ये शेतकर्यांना व्यवसाय साहित्य व विद्यार्थ्यांना खेळणी वाटप
देशेकर दाम्पत्याचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने भाजपचे ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर व चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांनी चिंध्रणमध्ये शेतकर्यांना व्यवसाय साहित्य व विद्यार्थ्यांना खेळणी वाटप करण्यात आली. दीपक फर्टिलासर अॅण्ड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड संचलित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper